आपल्याला एखाद्या ठिकाणी परिच्छेद करायचा असेल, तर आपण त्या ठिकाणी कर्सर नेऊन 'एंटर' कळ दाबतो. ती कळ दाबल्यावर फ्रेम बफरच्या त्या कोऑडिर्नेटवर एक ठराविक बाइट साठवला जातो. त्यानंतर आपण टाइप केलेले सुरक्षित केल्यावर सर्व बाइट डिस्कवर जमा होतात. पुन्हा आपल्याला डॉक्यूमेंट वाचायचे असेल तर ते बाइट्स फ्रेम बफरमध्ये येतात.
आपल्याला मायक्रोसॉफ्ट वर्ड प्रमाणे कोणताही प्रोग्राम वापरून वर्ड प्रोसेसिंग करता येते. त्यामध्ये कोणताही मजकूर टाइप किंवा त्याचे कसेही परिच्छेद तयार करू शकतात. मजकूर गडद, फिका, तिरपा आणि आडवा करू शकता. आपण टाइप केलेला मजकूर पाहिजे तेव्हा बदलू शकता. हे सर्व एका विशिष्ट प्रक्रियेद्वारे होते.
आपल्या संगणकाच्या स्क्रिनमध्ये 25 ओळी आणि प्रत्येक ओळीत 80 कप्पे असतात म्हणजे 80 गुणिले 25 बरोबर 2000 कप्पे असल्याचे मानले तर संगणकात 2000 बाइट्सची फ्रेम बफरची मेमरी असते. आपण केव्हाही कर्सर स्क्रिनवर फिरवून ती जागा दाखवतो. (उदा. सहावी ओळ 20 वा कॉलम) त्याच फ्रेम बफरमधील कोऑडिर्नेटवरच्या कप्प्यात आपण नव्याने टाइप करून ठेवता येते. अशा प्रकारे स्क्रिनवर अक्षर किंवा आकडे टाइप करून स्क्रिनवर दाखविण्याचे तंत्रज्ञान उपयोगात आणले जाते.
आपल्याला एखाद अक्षर गडद किंवा तिरपे दाखवायचे असेल तर यासाठी फ्रेम बफरमध्ये प्रत्येक चिन्हांसाठी दोन बाइट्स राखीव ठेवलेले असतात. त्यांना 'एट्रिब्युट बाइट्स' असे म्हणतात. यामध्ये आठ बिट्स असतात. मग त्यात बिट 0 असेल तर पुढील अक्षर नेहमीप्रमाणे दाखवायचं, 1 असेल तर गडद दाखवायचं असे ठरविता येते.
जेव्हा आपण वर्ड प्रोसेसरमध्ये काही अक्षरे सिलेक्ट करून ती ठळक दाखवण्यासाठी 'बी' वर क्लिक करतो. तेव्हा त्या अक्षरांसाठी ठेवलेल्या फ्रेम बफरमधल्या त्या चिन्हांसाठीच्या एट्रिब्युट बाइट्समधले ते बिट्स 1 केले जातात. हे कार्य वर्ड प्रोसेसिंगचे सॉफ्टवेअर करते. याप्रमाणे वर्डप्रोसेसरमध्ये आपल्याला अलायनिंग वगैरेच्या सोयी असतात. डावीकडे किती जागा सोडायची, पानावर नंबर द्यायचा वगैरे. | |
| |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा