kd Mumbai

कॉम्प्युटर व्हायरस

कॉम्प्युटर हाताळताना अचानक व्हायरस येण्याची नेहमी शक्यता असते. हा व्हायरस कॉम्प्यूटरमध्ये सुरक्षित केलेल्या फाइल्स करप्ट करतो. त्यामुळे आपल्या कॉम्प्युटरला धोका निर्माण होण्याची शक्यता असते.

एखादा प्रोजेक्ट तयार करण्यासाठी कॉम्प्युटरवर प्रोग्राम बनविलेला असतो. यामध्ये जावा, सी लँग्वेज, एक्सेल, डॉट नेट इत्यादी प्रोग्राम्स असतात. या प्रोग्राममध्ये सूचनांचा संच असतो. ( उदाहरणार्थ दुकानदाराचे बिल बुक छापणे, ग्रीटींग कार्ड इत्यादी.) अशा प्रकारच्या प्रोग्राममध्ये काही जण व्हायरस सोडतात.

व्हायरस सोडणार्‍या लोकांना कॉम्प्युटरची सखोल माहिती असते. त्यामुळे आपल्याला कोणत्या प्रोग्रामवर हल्ला करायचा हे लोकांना निश्चित करता येते. व्हायरसमुळे तयार असलेल्या फाइल्स एकापाठोपाठ नष्ट होऊ लागतात.

व्हायरसचे प्रकार
व्हायरसचा पहिला प्रकार म्हणजे 'कम्पॅनियन व्हायरस'. हा व्हायरस चांगल्या प्रोग्रामला खराब करत नाही. त्यामुळे प्रोग्राम सुरक्षित राहतो. परंतु, दुसरा व्हायरस एखाद्या चांगल्या प्रोग्राममध्ये बिघाड करतो. उदा. आपण 'विंडोज' मध्ये एखाद्या प्रोग्रॅमच्या नावावर किंवा आयकॉनवर डबल क्लिक केलं तर आपल्याला हवा असणारा मूळ प्रोग्रॅम सुरू होण्याऐवजी हा व्हायरसचा प्रोग्रॅमच नकळत सुरू होतो आणि त्याचा कार्यभाग उरकून मूळ प्रोग्रॅमकडे पुन्हा सूत्र देऊन टाकतो.

व्हायरसचा दुसरा प्रकार म्हणजे 'एक्झिक्युटेबल प्रोग्रॅम व्हायरस'. हा व्हायरस प्रोग्रामला सर्वात जास्त धोकादायक असतो. तो आपल्या कॉम्प्युटरच्या डिस्कवरील सर्व 'डिरेक्टरीज' सलग वाचत राहतो. प्रत्येक डिरेक्टरीत त्याला जी एक्झिक्युटेबल (म्हणजे आपण तिच्या नावावर डबल क्लिक केलं की तिचं काम सुरू होतं अशी ) फाइल दिसेल अशा प्रत्येक फाइलमध्ये प्रवेश करण्याचं तो मुख्य काम करतो. हा व्हायरस मूळ एक्झिक्युटेबल फाइल पूर्णपणे नष्ट करून टकातो.

तिसर्‍या प्रकारचा व्हायरस म्हणजे 'मेमरी रेसिडेंट व्हायरस'. या व्हायरसने एकदा आपल्या कॉम्प्यूटरमध्ये प्रवेश केल्यास तो नेहमी जागृतावस्थेत असतो म्हणून त्याला 'मेमरी रेसिडेंट' व्हायरस असे म्हणतात. पहिल्या दोन प्रकारातील व्हायरस डिस्कवरच्या फाइल्स आणि प्रोग्रॅम्सवर हल्ला करत असतो. जेव्हा आपण त्या फाइल्स उघडायला जाऊ तेव्हा तो व्हायरस जागृत होऊन आपलं काम साधतो.

पण 'मेमरी रेसिडंट व्हायरस' मात्र सदैव आपल्या कृतींचा कानोसा घेऊन त्यांच्यापैकी काहींचा स्वत: कडे ताबा घेतो. उदा. आपल्या की बोर्डवरची कळ दाबली की अक्षर पडद्यावर उमटायला पाहिजे पण की कीबोर्डशी संबंधित 'मेमरी रेसिडेंट व्हायरस' आपल्या कॉम्प्युटरमध्ये घुसला तर तो कीबोर्डचं नियंत्रण स्वत: कडे घेतो आणि ते अक्षर पडद्यावर उमटण्याऐवजी दुसरचं काहीतरी करेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: