kd Mumbai

ई-कचरा साफ करण्यासाठी टिप्स

संगणकाला अगोदर काम करण्यास वेग असे. परंतु, आता खूपच हळूहळू चालत असल्याच्या अनेक जणांच्या तक्रारी असतात. आता या तक्रारी करण्याची गरज नाही. कारण, त्यासाठी आम्ही आपल्याला काही टिप्स देत आहोत. या टिप्सचा आपण काळजीपूर्वक वापर केल्यास आपला संगणक सुरळीत चालेल......

1.
इंटरनेटच्या अति वापरामुळे आपल्या संगणकात मोठ्या प्रमाणावर 'टेम्पररी फाइल्स' तयार होत असतात. या फाइल्सची संख्या कमी केल्यास संगणकावरील ताण कमी होऊन स्पीड येण्यास मदत होते. यासाठी 'डिस्क क्लिनअप' चा वापर करून टेम्पररी फाइल्स 'रिसायकल बिन' मध्ये ठेवता येतात.

2. '
डिस्क क्लिनअप' साठी डेस्कटॉपवरील डाव्या बाजूला कोपर्‍यात असलेल्या 'स्टार्ट' बटण वर क्लिक करा. नंतर स्टार्ट-प्रोग्राम-एक्सेसरीज-सिस्टिम टूल ऑप्शनमध्ये जाऊन 'डिस्क क्लिनअप' चा ऑप्शन क्लिक करा. या प्रक्रियेनंतर आपल्या संगणकाने ड्राइव्ह निवड करायचा सांगितल्यास जो ड्राइव्ह आपल्याला क्लिन करायचाय तो निवडून ई-कचरा साफ करता येतो. साधारणत: आठवड्यातून एकदा अशा प्रकारची साफसफाई करणे आवश्यक आहे.

3.
दिवसातून एकदा तरी संगणकाची कचरापेटी म्हणजे 'रिसायकल बिन' साफ करावे. त्यासाठी 'रिसायकल बिन' वर राइट क्लिक करून 'Empty Recycle Bin' अशी आज्ञा द्यावी.

4.
आपला संगणक सर्व फाइल्स सु‍रक्षित करत असाल्याचे दाखवत असला तरी तो हार्डडिस्कमध्ये आपल्या फाइल्स विविध भागात (अचूक पद्धतीने) सुरक्षित करत असतो आणि आपल्याला बरोबर दाखवत असतो. त्यामुळे संगणकाचा वेग कमी कमी होता जातो. हे टाळण्यासाठी पुन्हा एकदा स्टार्ट-प्रोग्राम्स-एक्सेसरीज-सिस्टिम टूल मार्गे 'डिस्क डिफ्रॅग्मेण्टर' चा प्रोग्राम सुरू करावा.

'
डिफ्रॅग्मेण्टेशन' या प्रक्रियेला दोन ते तीन तासाचा वेळ लागतो. त्यासाठी रात्री झोपताना मशिन 'डिफ्रॅग्मेण्टेशन' ला लावू शकतो. 'डिफ्रॅग्मेण्टेशन' मुळे मोठ्या प्रमाणावर जागा उपलब्ध होऊन संगणकाचा वेग वाढण्यास मदत होते.

सामान्यत: अशा प्रकारची साफसफाई महिन्यातून एकदा करावी. अशा प्रकारची साफसफाई वेळेवर केल्यास आपला संगणक सुरळीत चालेल. त्यामुळे ई-सफाई करणे आवश्यक आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: