आपल्या ई-मेल अकाऊंटमध्ये अनेकदा एखादया कंपनीची लॉटरी लागल्याचे, एखादे मोठे बक्षीस मिळाल्याचे किंवा अन्य अनेक प्रकारच्या प्रलोभनांची माहिती देणारे किंवा अनेकदा भावनिक आवाहन करणारेही मेल येत असतात. या मेलच्या माध्यमातून तुमचा बॅंक अकाऊंट नंबर किंवा क्रेडिट कार्ड नंबरचीही माहिती मागविली जाते. या मेलना कधीही उत्तर देउ नका.
या माध्यमातून मिळविलेल्या माहितीचा दुरुपयोग होण्याची शक्यता असते. यातून आपल्याला मोठा गंडा घातला जाण्याची शक्यता असते. अशा प्रकारचे सायबर गुन्हे करणा-यांना पकडणे अवघड असले तरीही असे मेल ओळखणे मात्र शक्य आहे.
स्पॅम मेल कसा ओळखावा?
स्पॅम मेल किंवा प्रलोभने देणा-या अशा मेलला ओळखणे तसे कठीण नाही. अशा मेल पाठविणा-याच्या ई-मेल आयडी जरा व्यवस्थित पाहिल्यानंतर असे लक्षात येईल. अशा मेल आयडीमध्ये अनेक शब्द आलटून पालटून तसेच वापरलेले असतात. त्यामुळे त्यांचा अर्थच लागत नाही. एखादया मोठया कंपनीच्या नावाने असा मेल आला तर त्या मोठया कंपनीच्या नावानंतर एखादया फ्री सर्व्हीस पुरविणा-या डोमेनचे नाव जोडलेले असते. अनेकदा अशा मेलच्या सब्जेक्ट लाईनमध्येही 'अर्जंट' असा शब्द प्रयोग हमखास केलेला असतो.
स्पॅम मेल थांबवा..
सध्या बाजारात अशा प्रकारचे मेल आपल्या इनबॉक्समध्ये आल्याआल्याच डिलीट करू शकणारे अनेक सॉफ्टवेअर व फिल्टर उपलब्ध्ा आहेत. जर तुम्हाला असा मेल आल्यास त्याची तक्रार फेडरल ट्रेड कमीशनकडेही करता येते. तेव्हा यापुढे जर का असा मेल आला तर त्याला बळी न पडलेलेच बरे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा