kd Mumbai

वर्ड प्रोसेसिंग

जेव्हा एखाद्या ठिकाणी परिच्छेद पाडायचा असेल, तर आपण त्याठिकाणी कर्सर नेतो आणि 'एंटर' की दाबतो. ती दाबल्यावर फ्रेम बफरच्या त्या कोऑडिर्नेटवर एक ठराविक बाइट साठवला जातो. (एन्टरचा!) आता आपण टाइप केलेलं जेव्हा सेव्ह करतो तेव्हा ती सगळी बाइट्स डिस्कवर साठवली जातात. जेव्हा पुन्हा आपल्याला ते डाक्युमेंट वाचायचं असेल तेव्हा ते बाइट्स फ्रेम बफरमध्ये येतात. आता पुन्हा अॅट्रिब्युट बाइट्सचा वापर करून डिस्प्ले इलेक्ट्रॉनिक्स पाहिजे ती अक्षरं गडद, तिरपी वगैरे दाखवतं.

आपण मायक्रोसॉफ्ट वर्ड सारखा कुठलासा प्रोग्रॅम वापरून वर्ड प्रोसेसिंग करू शकतो. आपण त्यात कुठलंही टेक्स्ट टाइप करू शकतो. त्याचे परिच्छेद पाहिजे तसे पाडू शकतो. मजकूर गडद, फिका, तिरपा करू शकतो. पाहिजे तेव्हा अगोदर लिहिलेलं बदलू शकतो. हे सगळं होतं कसं? आपल्या कम्प्युटरच्या पडद्यामध्ये २५ ओळी अाणि प्रत्येक ओळीत ८० कप्पे असे एकूण ८० गुणिले २५ बरोबर २००० कप्पे आहेत असं मानलं तर कम्प्युटरमध्ये २००० बाइट्सची फ्रेम बफरची मेमरीही असते. केव्हाही आपण कर्सर पडद्यावर हलवून जी जागा किंवा कोऑडिर्नेट्स दाखवतो (उदा. सहावी ओळ २०वा कॉलम) त्याच फ्रेम बफरमधल्या कोऑडिर्नेटवरच्या कप्प्यात आपण नव्यानं टाइप केलेलं जाऊन बसतं. आपण जर ए टाइप केलं तर त्याचे ८ अॅस्की बिट्स हे त्या फ्रेम बफरच्या एका बाइटमध्ये जाऊन बसतात. आता त्याचं पुन्हा आपल्याला पडद्यावर 'ए' असं त्या चित्रात कर्सरच्याच ठिकाणी दाखवण्याचं काम 'डिस्प्ले इलेक्ट्रॉनिक्स' रास्टर स्कॅनिंगचा उपयोग करून कसं करतं हे आपण पूवीर् पाहिलंच आहे.

हे झालं फक्त अक्षर किंवा आकडे टाइप करून स्क्रीनवर दाखवण्याचं किंवा छापण्याचं तंत्र. पण एखादं अक्षर जास्त गडद किंवा तिरपं दाखवायचं असेल तर? यासाठी मग फ्रेम बफरमध्ये प्रत्येक चिन्हासाठी २बाइट्स राखून ठेवतात. म्हणजे स्क्रीनवरच्या २००० अक्षरांसाठी फ्रेम बफरमध्ये ४००० बाइट्स. २००० हे पूवीर्सारखे प्रत्यक्ष अक्षर, आकडे, हे अॅस्की कोडभाषेत साठवण्यासाठी आणि उरलेले २००० हे त्या अक्षरांच्या गुणधर्मासाठी. म्हणूनच त्यांना 'अॅट्रिब्युट बाइट्स' म्हणतात. आता या अॅट्रिब्युट बाइटमध्येही ८ बिट्स असतात. मग त्यातला अमुक अमुक बिट ० असेल तर पुढचं अक्षर नेहमीप्रमाणे दाखवायचं, १ असेल तर गडद दाखवायचं असं ठरवता येतं. तसंच दुसरा कुठलातरी बिट ० असेल तर ते अक्षर तिरपं दाखवायचं. १ असेल तर सरळ, किंवा आणखी तिसरा बिट ० असेल तर ते अक्षर अधोरेखित (अंडरलाइन) दाखवायचं. नाहीतर तसंच वगैरे संकेत नक्की करता येतात. आता जेव्हा आपण वर्ड प्रोसेसरमध्ये काही अक्षरं सिलेक्ट करतो आणि जेव्हा ती गडद दाखवण्यासाठी 'बी' वर क्लिक करतो तेव्हा त्या अक्षरांसाठी ठेवलेल्या फ्रेम बफरमधल्या त्या चिन्हांसाठीच्या अॅट्रिब्युट बाइट्समधले ते ते बिटस् १ केले जातात. हे ते वर्ड प्रोसेसरचं सॉफ्टवेअर करतं. आता स्क्रीनवर अक्षर उमटवताना किंवा छापताना अॅट्रिब्युट बाइटमधल्या संकेताप्रमाणे मग इलेक्ट्रॉनिक्स कामं करतं, आणि अक्षरं गडद दाखवतं.

जेव्हा एखाद्या ठिकाणी परिच्छेद पाडायचा असेल, तर आपण त्याठिकाणी कर्सर नेतो आणि 'एंटर' की दाबतो. ती दाबल्यावर फ्रेम बफरच्या त्या कोऑडिर्नेटवर एक ठराविक बाइट साठवला जातो. (एन्टरचा!) आता आपण टाइप केलेलं जेव्हा सेव्ह करतो तेव्हा ती सगळी बाइट्स डिस्कवर साठवली जातात. जेव्हा पुन्हा आपल्याला ते डाक्युमेंट वाचायचं असेल तेव्हा ते बाइट्स फ्रेम बफरमध्ये येतात. आता पुन्हा अॅट्रिब्युट बाइट्सचा वापर करून डिस्प्ले इलेक्ट्रॉनिक्स पाहिजे ती अक्षरं गडद, तिरपी वगैरे दाखवतं. शिवाय जिथे तो एंटर बाइट येतो तिथे पडद्यावर किंवा छापताना तो नवीन परिच्छेदावर पुढचं दाखवतो किंवा छापतो.

याचप्रमाणे वर्डप्रोसेसरमध्ये आपल्याला अलायनिंग वगैरेच्या सोयी असतात. डावीकडे माजिर्न किती सोडायचं, पानावर नंबर द्यायचा वगैरे.

कम्प्युटरमधल्या 'वर्ड स्टार', 'वर्ड परफेक्ट' वगैरे सुरूवातीच्या वर्ड प्रोसेसर्समध्ये हे तत्त्व वापरलं जाई. पण मग 'ग्राफिकल' स्क्रीन्सचा जमाना आला, तसे वर्ड प्रोसेसर्सही बदलले. नुसतं टायपिंग करून अक्षरं ठळक, तिरकी वगैरे करतानाच शेकडो फॉण्टस्, अनेक रंग, अक्षरांचे विविध आकार अशा अनेक गोष्टी करणं आता मायक्रोसॉफ्ट वर्ड, ओपन ऑफिस वर्ड अशा अनेक प्रोसेसर्सनी शक्य केलं. या क्रांतीमागचे तंत्रज्ञानातले बदल कोणते?

वर्ड वगैरे सॉफ्टवेअर्समध्ये काय होतं की पडद्यावर कोणतंही अक्षर, आकडा, चिन्ह दाखवण्यासाठी एक चौकोन आहे असं ही सॉफ्टवेअर्स मानतात. उदाहरणार्थ हा चौकोन ९ गुणिले १४ अशा आकाराचा असू शकतो. यातल्या ९ गुणिले १४च्या आकारासाठी ९ उभे आणि १४ आडवे ठिपके मानले, आणि प्रत्येक ठिपक्यासाठी एक बिट आहे असं मानलं की पुढचं काम सोपं आहे. आपण बऱ्याच ठिकाणी (डिजिटल घडयाळं, रेल्वेस्टेशनच्या पाट्या, क्रिकेटचे धावफलक) माहिती कशी दाखवतात हे पाहिलं असेल. त्यासाठी इंग्रजी ८चा साचा बसवायचा. (ज्यात तीन आडव्या आणि दोन उभ्या रेघा असतात). मग त्याचा वापर करून अमुक अमुक आकडा दाखवायचा तर त्या-त्या रेघाच फक्त प्रकाशमान दाखवायच्या, ही त्यातली युक्ती असते. उदाहरणार्थ आठचा आकडा दाखवायचा तर सगळ्याच रेघा प्रकाशमान असल्या पाहिजेत. पण शून्यच्या आकड्यासाठी पोटातली रेघ अंधारी हवी! आता आपण २ गुणिले २ च्या साच्याऐवजी ९ गुुणिले १४ च्या साच्याचा वापर करतोय, इतकाच काय तो फरक.

आता या ९ गुणिले १४ च्या साच्यातल्या बारीक रेघा - खरं तर ठिपकेच आपण नियंत्रित करू शकलो तर? मग आपल्याला हवे ते ठिपके ठळक आणि हवे ते फिके करता आले तर हव्या त्या फॉण्टसाठी हव्या त्या आकारात अक्षरं लिहिता येतील! म्हणजेच काय तर आता पडद्यावर ६४० उभे आणि ४८० आडवे कप्पे (पिक्सेल्स) असले तर प्रत्येक पिक्सेलच्या ठिकाणी ९गुणिले १४चा साचा असेल, आणि प्रत्येक पिक्सेल कुठल्या रंगात वगैरे दिसावा म्हणून १६ बिटस् वापरले तर कम्प्युटरच्या पडद्यावर मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये जसं टाइप केलेलं जसं हवं तसं दिसण्यासाठी फ्रेम बफरमध्ये ६४० ३ ४८० ३ ९ ३ १४ ३ १६ इतके बिट्स खचीर् पडतील! पण म्हणूनच मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये टाइप केलेला मजकूर टाइपरायटरच्या मजकुरापेक्षा खूपच सुंदर दिसतो!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: