आपण आपल्या मेंदूंचा १० टक्केच भाग वापरतो , उरलेला ९० टक्के भाग आपण कधी वापरतच नाही. कॅम्प्युटरचंही अस्सचं आहे. रोज कम्प्युटर वापरणारेही , कोणीतरी शिकवलेल्या पद्धतीने कामं करत राहतात. पण या सायबरजगात अनेक आयडिया आहेत , ज्या नेहमीचं कॅम्प्युटिंग सोप्पं करु शकतील. अशा भन्नाट आणि इण्ट्रेस्टिंग आयडिया सांगणारा ' जस्ट यंग ' चा नवीन कॉलम
तुम्ही गुगलवर काहीतरी अर्जं....ट शोधताय आणि ' पेज नॉट फाउण्ड ' अशी एरर आली , तर काय कराल ? खरं तर अशा वेळी फक्त डोक्यात वीज जायचीच बाकी असते. पण ' आपल्या ' ( इण्टरनेटवर प्रेम करणारा कोणीही गुगलला ' परकं ' कसं मानू शकेल) गुगलनेच यावर उत्तर शोधून ठेवलंय.
जेव्हा अशी एरर येते तेव्हा बऱ्याचदा असं होतं की , त्या साइटने ते पेज इण्टरनेटवरून काढून टाकलेलं असतं. हे पेज इण्टरनेटच्या जगातच उरलं नसेल तर गुगल तरी कुठून शोधणार ? पण , यातून मार्ग काढण्यासाठी एक स्पेश्शल रस्ता आहे. ते पेज काढून टाकण्याआधी गुगलने ते आपल्यासाठी सेव्ह केलेलं असतं. याला म्हणतात , ' गुगल कॅश. '
ही ' गुगल कॅश ' फॅसिलिटी वापरण्याची पद्धतही अगदी सोपी आहे. गुगलवर एखादा सर्च मारल्यावर प्रत्येक सर्चच्या पुढे 'Cached' असा ऑप्शन दिसतो. त्यावर क्लिक केल्यावर गुगलने कॅशमध्ये सेव्ह केलेलं पेज सहज उपलब्ध होऊ शकतं.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा