सध्याचा जमाना वीजबचतीचा आहे. घरी कम्प्युटर घेतलाय पण लोडशेडिंगमुळे ब-याचदा तो बंदच असतो. जनरेटर वापरला तर पीसीसाठी जास्त वीज वापरली जाते अशा तक्रारी येतात. या तक्रारी दूर करण्यासाठी 'पॉवरसेव्हिंग कम्प्युटिंग' ही काळाची गरज ठरली आहे.
* मॉनिटरच्या व्हाईट आणि ब्राईट कलरसाठी जास्त वीज वापरली जाते. याउलट ब्लॅक आणि डार्क कलरसाठी कमी विजेचा वापर होतो. त्यामुळे मॉनिटरवर शक्य तिथे ब्लॅक आणि डार्क कलर वापरावा.
* वॉलपेपर किंवा स्क्रीन सेव्हर नसलेला मॉनिटर वीजेची भरपूर बचत करतो. त्यामुळे जर वॉलपेपर लावणारच असाल तर शक्यतो अधिकाधिक काळा रंग असलेले वॉलपेपर लावा. नाही तर वॉलपेपरच्या यादीत सर्वात वर असलेल्या 'नन' या ऑप्शनवर क्लिक करा आणि वॉलपेपरला टाटा करा. स्क्रीन सेव्हरबाबतही तेच.
* तुम्ही काही वेळ कम्प्युटर वापरणार नसाल तर 'स्टॅण्ड बाय मोड'चा वापर करा. यासाठी मॉनिटरवर राइट क्लिक करुन 'प्रॉपटीर्ज'मध्ये जा. तेथे डेस्कटॉप शेजारच्या स्क्रीनसेव्हर टॅबमध्ये जा. तिथेच खाली असलेल्या पॉवर बटणावर क्लिक करा. तेथे पॉवर स्किममध्ये स्टॅण्ड बाय मोडमध्ये गरजेप्रमाणे वेळ द्या. समजा, तुम्ही पाच मिनिटांची वेळ दिली आणि पाच मिनिटं कम्प्युटरवर काहीच काम न झाल्यास तो आपोआप अर्धवट शट डाऊन होतो. माऊस अथवा की बोर्डच्या हालचालीने पुन्हा कम्प्युटर सुरू होतो. यामुळे सुरू असलेल्या कामाला काहीही होत नाही.
* किमान एक तास कोणतंही काम करायचं नसेल तर कम्प्युटर सरळ शट डाऊन करा.
* इण्टरनेटच्या जमान्यात बहुसंख्य कम्प्युटर वेबसर्फिंगसाठी वापरले जातात. अनेक वेबसाइटमध्ये व्हाईट कलरचा समावेश असतो, तिथं काय करायचं? इण्टरनेट जगातही आता वीजबचतीचं लोण पसरतेय. गुगलही 'कस्टम सर्च'अंतर्गत ब्लॅक झालंय. त्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या हिप मिडियाने www.blackle.com हे ब्लॅक कलरचं सर्च इंजिन सुरू केलंय. एकदा ही पॉवरसेव्हींग इण्टरनेट मुशाफिरी करून तर पाहा.
* डेस्कटॉप कम्प्युटरऐवजी लॅपटॉप वापरल्यास किमान ७५ टक्के वीज बचत होते.
* डेस्कटॉपपेक्षा एलसीडी मॉनिटर वापरल्यास ६० टक्के वीजेची बचत होते.
* स्क्रीनचा ब्राइटनेस कमी करुनही वीज वाचवता येते.
आज पॉवरसेव्हिंग कम्प्युटिंगसाठी जगभर मोहिमा होत आहेत. कारण आपल्याकडे वीज असली तरी, अनेक घरात अंधार आहे हे विसरून कसं चालेल?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा