व्हायरसमुळे म्हणा किंवा हार्डडिस्क क्रॅश झाल्यामुळे डेटा गेल्याच्या तक्रारी अनेक जण करतात. हार्डडिस्कमध्ये बॅड सेक्टर निर्माण झाल्यामुळे कम्प्युटरमधला डेटा उडून जाऊ शकतो. अशा वेळी आपल्या एवढ्या वर्षांच्या कामावर काही क्षणात पाणी पडू शकतं. त्यासाठीच आपल्या कम्प्युटरमधला डेटा कसा सुरक्षित ठेवावा यासाठी या काही सोप्या टिप्स...
* जो डेटा आपल्यासाठी मस्ट आहे, त्याचा बॅकअप ठेवावा. त्यासाठी तो एकाच ठिकाणी न ठेवता हार्डडिस्क, सीडी, पेन ड्राइव्ह अशा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये ठेवता येतो.
* आपला महत्त्वाचा डेटा अर्थात वर्ड, एक्सेल, प्रेझेण्टेशन, गाणी, गेम्स, सिनेमा यांच्या फाइल्सपैकी ज्या फाइल आवश्यक आहेत तेवढ्याच 'हार्डडिस्क'मध्ये ठेवा. बाकीच्या फाइल सरळ डिलीट करा. नको असलेले प्रोग्राम काढून टाका. यामुळे व्हायरसची शक्यता कमी होते.
* ज्या फाइल हव्या आहेत, पण कधीतरीच वापरणार, त्या सीडी, डीव्हीडी, पेन ड्राइव्ह किंवा एक्स्टर्नल हार्डडिस्कमध्ये टाकून ठेवा.
* एका सीडीमध्ये ७०० एमबी आणि डीव्हीडीमध्ये ४.७ एमबीपर्यंत डेटा ठेवता येतो. पेन ड्राइव्हमध्ये तर ५१२ एमबीपासून ८ जीबीपर्यंत विविध ब्रॅण्डचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. ४० जीबीपासून ३०० जीबीपर्यंतच्या एक्स्टर्नल हार्डडिस्क बाजारात उपलब्ध आहेत. त्यामध्ये प्रचंड डेटा सुरक्षित ठेवता येतो.
* गुगलच्या मदतीने तुम्ही एखाद्या र्सव्हरवर डेटा सुरक्षित ठेवू शकता, तोही अगदी मोफत! त्यासाठी 'गुगल डॉक्स' ही सेवा वापरता येईल. तुमचा जीमेल पासवर्ड वापरून जगाच्या पाठीवर कुठेही इण्टरनेटच्या मदतीने 'गुगल डॉक्स'मध्ये डेटा स्टोअर करता येतो. ज्यांना वर्ड, एक्सेल, पॉवर पॉइण्ट प्रेझेण्टेशन हाताळता येतात त्यांना ही सेवा सहज वापरता येईल.
* गुगलप्रमाणेच अन्य काही साइट अशा आहेत, ज्या ऑनलाइन डेटा स्टोअरेजसाठी मदत करतात. आपल्या महत्त्वाच्या फाइल्स तुम्ही या साइट्सवर अपलोड करून ठेवू शकता.
* जो डेटा कम्युटरवर ठेवायचा आहे, त्याची व्यवस्थित विभागणी करा. त्यासाठी सी ड्राइव्हमध्ये पाटिर्शन करून किमान आणखी एक ड्राइव्ह तयार करा. त्याला नाव द्या. 'सी'मध्ये प्रोग्राम आणि बाकीचा डेटा फाइल पाटिर्शन करून नव्याने तयार केलेल्या ड्राइव्हमध्ये टाका. त्यामुळे हार्ड डिस्क क्रॅश झाली अथवा काही कारणामुळे फॉरमॅट करावी लागली, तर फक्त नव्याने प्रोग्राम इन्स्टॉल करावे लागतील. तुमच्या डेटाचं नुकसान होणार नाही.
हे सर्व करूनही तुमचा डेटा एखाद्या तांत्रिक बिघाडामुळे नॉट अॅक्सेसिबल झाला, तर तो रिस्टोअर तंत्राने परत मिळवता येतो. त्यासाठी...
* मायक्रोसॉफ्टच्या 'विण्डोज एक्स पी' या ऑपरेटिंग सिस्टममध्ये रिस्टोअर पॉइण्टचा पर्याय उपलब्ध आहे. प्रोग्रॅम-अॅसेसरीज-सिस्टम टुल्स-रिस्टोअर पॉइण्ट अशा मार्गांचा वापर त्यासाठी करावा लागेल. रिस्टोअर क्लिक करताना कम्प्युटर किती मागे न्यायचा हे ठरलं, की त्या तारखेला कम्प्युटर ज्या स्थितीमध्ये असेल त्यामध्ये परत येतो. या पद्धतीने गमावलेला डेटा परत मिळवता येईल.
* डेटा रिस्टोअर करणारी काही सॉफ्टवेअर्स बाजारात आहेत. त्यांच्या साहाय्याने गमावलेला डेटा परत मिळवता येतो. मात्र त्यासाठी खिशात हात टाकावा ला
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा