kd Mumbai

याहूसाठी मायक्रोसॉफ्ट अजूनही बोहल्यावर

इंटरनेट कंपनीचा समावेश नसलेली ऑफर घेऊन याहू कंपनी विकत घेण्यासाठी प्रस्ताव दिल्याचे मायक्रोसॉफ्ट कॉपोर्रेशनने जाहीर केले आहे. याहू ताब्यात घेण्याचा परंतु संपूर्णपणे नाही, अशा स्वरुपाचा प्रस्ताव मायक्रोसॉफ्टने तयार केला आहे.

जुलैमध्ये याहूच्या भागधारकांची वाषिर्क बैठक असून, एक भागधारक व अब्जाधीश गुंतवणूकदार कार्ल इकान यांनी याहूच्या संचालक मंडळावर नियंत्रण मिळवण्यासाठी व्यूहरचना सुरू केली आहे, या पार्श्वभूमीवर मायक्रोसॉफ्टची घोषणा महत्त्वाची मानण्यात येत आहे. मे महिन्यात मायक्रोसॉफ्टने याहूच्या प्रति शेअरसाठी ३३ डॉलरची ऑफर दिली होती, परंतु ही बोलणी किमतीच्या मुद्यावरुन फिस्कटली. मायक्रोसॉफ्टची ऑफर नाकारणे योग्य नसल्याची प्रतिक्रिया इकान यांनी व्यक्त करताना, याहूच्या संचालक मंडळाने मायक्रोसॉफ्टशी पुन्हा बोलणी करावीत असा त्यांचा आग्रह आहे. यावेळी संपूर्ण विकत घेण्याचा आपला इरादा नसल्याचे, परंतु ऑनलाइन व अॅडव्हर्टायझिंग व्यवसायाचा विस्तार करण्याची योजना असल्याचे मायक्रोसॉफ्टच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: