kd Mumbai

कम्प्युटरची 'कोड'भाषा

कम्प्युटरचं सारं काम या ०-१ च्या भाषेत चालतं. अर्थात हार्डवेअरमध्ये ही बिट-बाइट्स लिहिताना ०-१ असं प्रत्यक्षात लिहायची गरज नसते. त्याऐवजी वीजप्रवाह, चुंबक वगैरे गोष्टी वापरता येतात. फक्त 'वीजप्रवाह नाही' किंवा 'उत्तर धुवाकडचं चुंबक' असं म्हणायच्या ऐवजी ०, तर 'वीजप्रवाह आहे' किंवा 'दक्षिण ध्रुवाकडचं चुंबक' असं म्हणण्याऐवजी १ असं आपल्या सोयीसाठी म्हणायचं, इतकंच!

समजा, दोन प्रेमींना त्यांचे आईवडील 'खानदान की इज्जत' वगैरे भानगडींमुळे भेटू देत नाहीयेत, आणि मोबाइल फोन नसताना त्यांना एकमेकांना संदेश पाठवायचे आहेत. जर ते एकमेकांच्या समोर रहात असतील तर त्यांना प्रत्येकी एक दिवा घ्यावा लागेल. त्या दिव्यातून दिसणारा प्रकाश कमी-जास्त करताना सगळ्यात कमी प्रकाश म्हणजे A , त्याहून थोडा जास्त प्रकाश म्हणजे B , त्याहून जास्त म्हणजे C , वगैरे. आणि तसंच abcd ; ० ते ९, उद्गारचिन्हं, पूर्णविराम वगैरे बाबींसाठीही प्रकाशाची एक ठराविक तीव्रता ठरवून घ्यावी लागेल. ही सारी अक्षरं, आकडे, चिन्हं वगैरे मोजली तर १४० पेक्षा जास्त होतात. म्हणजे त्या दोघांना १४० पेक्षा जास्त प्रकाशाच्या पातळ्या अचूकपणे मोजाव्या लागतील. अन्यथा 'ध' चा 'मा' होईल!

अर्थातच ही पध्दत जाम कटकटीची आहे. त्यात प्रत्यक्ष दिव्यात आणि आपल्या डोळ्यात कालांतराने खूप चुका व्हायला लागतीलच. म्हणून या 'अॅनॅलॉग' पध्दतीऐवजी डिजिटल पद्धत वापरली तर? दिव्याची अचूक तीव्रता मोजण्यापेक्षा फक्त तो चालू आहे की बंद, एवढंच बघायचं म्हणजे जरी दिवा थोडासा बिघडला आणि त्याच्या प्रकाशाची तीव्रता किंचितशी कमी झाली तरी तो 'चालू' आहे हे आपल्या लक्षात येईल. किंवा तो अतिशय मंद झाला तरीही तो 'बंद' आहे असंच आपण समजू. म्हणजे यात चुका खूपच कमी होतील. जर तो बंद असेल तर A समजायचं, चालू असेल तर B आहे असं म्हणायचं. या चालू-बंदच्या क्लिष्ट भाषेऐवजी आपण बंदला ० आणि चालूला १ असं म्हणुया. मग ० म्हणजे A आणि १ म्हणजे B . म्हणजे एका दिव्यानं दोनच अक्षरं या कोडलिपीत आपण बसवू शकतो. पण मग बाकी साऱ्या अक्षरांचं काय? म्हणजे एकच दिवा पुरणार नाही. दोन दिवे वापरले तर दोन्ही बंद (००) म्हणजे A , पहिला बंद - दुसरा चालू (०१) म्हणजे B , पहिला चालू-दुसरा बंद (१०) म्हणजे C , आणि दोन्ही चालू (११) म्हणजेच D , अशा चार अवस्था मिळतील. त्याही पुरेशा नाहीत. मग जर आणखी एक दिवा वापरला, तर? तीन दिव्यांनी आठ, चार दिव्यांनी सोळा, पाच दिव्यांनी बत्तीस, अशा दर दिव्यामागे दुप्पट होत राहणा - या अवस्था आपल्याला मिळत जातील. असं करत करत सात दिव्यांनी १२८, तर आठ दिव्यांनी २५६ वेगवेगळ्या अवस्था मिळतील. म्हणजेच १४० पेक्षा जास्त अक्षरं, आकडे, चिन्हं वगैरे दाखवण्यासाठी आठ दिवे किंवा आठ बिटस् पुरेत. पण कुठले आठ बिटस् म्हणजे कुठलं चिन्हं हे ठरवण्यासाठी पुन: एक स्टँडर्ड लागेल. आजकाल 'अॅस्की' हे एक लोकप्रिय स्टॅंडर्ड आहे. त्यात A म्हणजे ०१०००००१, B म्हणजे ०१००००१० असं सगळ्या चिन्हांचं एक कोष्टक मिळतं. अॅस्की कम्प्युटर्समध्ये मेमरी, कीबोर्ड, डिस्क, सीडी अशा सर्वत्र हीच कोडभाषा वापरली जाते.

कम्प्युटरचं सारं काम या ०-१ च्या भाषेत चालतं. अर्थात हार्डवेअरमध्ये ही बिट-बाइट्स लिहिताना ०-१ असं प्रत्यक्षात लिहायची गरज नसते. त्याऐवजी वीजप्रवाह, चुंबक वगैरे गोष्टी वापरता येतात. फक्त 'वीजप्रवाह नाही' किंवा 'उत्तर धुवाकडचं चुंबक' असं म्हणायच्या ऐवजी ०, तर 'वीजप्रवाह आहे' किंवा 'दक्षिण धुवाकडचं चुंबक' असं म्हणण्याऐवजी १ असं आपल्या सोयीसाठी म्हणायचं, इतकंच! कम्प्युटरमधील मेमरी ही मेगाबाईट्स (१०लाख) किंवा गिगाबाईट्स (१०० कोटी) मध्ये मोजतात. म्हणजेच १ गिगाबाईट (१ जीबी) मेमरीत १०० कोटी बाईट्स असतात. त्यातल्या प्रत्येक बाईटमध्ये एक अक्षर, आकडा किंवा चिन्ह मावतं. प्रत्येक बाईटमध्ये आठ अशा काहीतरी गोष्टी असतात (वीजप्रवाह, चुंबकत्व) की ज्या असतात (१) किंवा नसतात (०). त्यांच्या या अवस्थाच हार्डवेअरला कळतात. आपण बोलायला फक्त सोपं म्हणून या बिट्सना ० आणि १ अशी नावं देतो. त्यामुळे कुठल्याही बाईटमध्ये जेंव्हा आपण न् हे अक्षर साठवतो तेव्हा त्या बाईटमधले आठ बिट्स (म्हणजेच त्यातलं हार्डवेअर) त्या ० आणि १ च्या कोडभाषेप्रमाणे बदलतात. मग तो बाईट मेमरीतला असूदे की डिस्कवरचा किंवा सीडीवरचा.

आपण जेव्हा कीबोर्डवर A हे अक्षर टाईप करतो, तेव्हा त्या कीबोर्डच्या खालच्या सकिर्टमधून जे सिग्नल्स तयार होतात त्यामुळे मेमरीमधल्या एका बाईटमधले आठ बिट्स हे ०१०००००१ असे होतात. आणि व्हीडियोचं हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर याच बिट्सचा वापर करून पडद्यावर पुन: A हे अक्षर उमटवतं. म्हणजे आपल्याला आतमध्ये कीबोर्डवरच्या A चं ० आणि १ मध्ये झालेलं रुपांतर आणि या ० ते १ चं पुन: स्क्रीनसाठी A मध्ये झालेलं रुपांतर कळण्याची गरजच नसते. तसंच जेव्हा आपण हे अक्षर डिस्कवर लिहितो, तेव्हा या मेमरीतल्या आठ बिट्स प्रमाणेच डिस्कवरचेही ८ बिटस् हे बदलले जातात ( ०१०००००१ असे होतात). याला आपण हे अक्षर डिस्कवर लिहिणं म्हणतो. जेव्हा आपण डिस्कवरून ते अक्षर मेमरीत वाचतो, तेव्हा डिस्कवरच्या ८ बिट्सप्रमाणे मेमरीतलेही ८ बिट्स बदलले जातात. मग ते जेव्हा आपण छापतो किंवा पडद्यावर दाखवतो तेव्हा पुन: त्या ० आणि १ चा वापर करून त्यांचं रूपांतर A असं आपल्याला कळेल

अशा चिन्हात केलं जातं. म्हणजे थोडक्यात कीबोर्ड, स्क्रीन आणि प्रिंटर असा आपला संबंध येईल, तिथे आपण न्, क्च या भाषेत बोलतो, पण कम्प्युटरच्या

आतमध्ये आपल्या नकळत ० आणि १ च्या कोडभाषेत व्यवहार चालतात!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: