बँकिंग इंडस्ट्रीचा चेहरामोहरा इंटरनेट किंवा ई-बँकिंगमुळे बदलत आहे. अन्य उद्योगांपेक्षा र्वल्ड वाइड वेब आथिर्क सेवांसाठी जास्त परिणामकारक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
इंटरनेट बँकिंग यशस्वीरीत्या दाखल केल्यामुळे होणारे फायदे :
* मासिक फी न भरताही खात्याचा आढावा घेता येतो.
* बिलांचा भरणा शुल्काखेरीज करता येतो.
* पर्सनल लोन, मॉट्रगेज आदींसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुलभ होते.
* खात्यातील व्यवहार २४ उपलब्ध असतात.
* ग्राहक जगभरात कुठेही असला तरी तो आपल्या खात्याच्या संपर्कात राहून व्यवहार करू शकतो.
बँकांना होणारे फायदे :
* ग्राहकाशी संपर्क यंत्रणा सक्षम होते.
* जास्तीत जास्त सेवा देणे शक्य होते.
* नवीन ग्राहक आकषिर्त करण्यासाठी व्यासपीठ मिळते.
* स्पर्धकांनी दिलेल्या सेवाही स्पर्धात्मक दरात देता येतात.
* ग्राहक सोडून जाण्याच्या प्रमाणात घट होते.
सुरक्षितता हा इंटरनेट बँकिंगसाठी महत्त्वाचा भाग आहे. ग्राहकाची माहिती सुरक्षित राखणे आणि फसवणूक टाळणे ही या क्षेत्रातील आव्हाने आहेत. फायरवॉल्स, फिल्टरिंग राउटर्स, एन्क्रिप्शन व डिजिटल सटिर्फिकेशन या माध्यमातून अनाहूत प्रवेशाला आळा घालण्यात येतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा