kd Mumbai

इंटरअॅक्टिव्ह व्हा!

इंटरनेटवर आपली स्वत:ची वेबसाइट असावी असे अनेकांना वाटते. पण ही साइट तयार करणे म्हणजे मोठे कठीण काम आहे आणि त्याला खर्चही बराच येतो, असे मानले जाते. परंतु याही बाबतीत गुगल आपल्या मदतीला धावून आले आहे. त्यांनी गूगलपेजेस नावाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

गेल्या वेळेस या कॉलममध्ये आपण स्वत:चे लेटरहेड कसे तयार करायचे ते पाहिले. ते टपालाने पत्र पाठवायला उपयोगी पडतेच, पण ईमेलचा उपयोग करतानाही त्याचा उपयोग होतो. त्यापुढे जाऊन इंटरनेटवर आपली स्वत:ची वेबसाइट असावी असे अनेकांना वाटते. पण ही साइट तयार करणे म्हणजे मोठे कठीण काम आहे आणि त्याला खर्चही बराच येतो, असे मानले जाते. काही प्रमाणात ते खरेही आहे. परंतु याही बाबतीत गुगल आपल्या मदतीला धावून आले आहे. त्यांनी गूगलपेजेस नावाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यावर तुम्ही तुमचे स्वत:चे पेज तयार करू शकता. त्यात वेगवेगळ्या लिंक्स देऊ शकता, तुमचे फोटो टाकू शकता, स्वत:चा उद्योगधंदा असला तर त्याची जाहिरातही करू शकता. आणि हे सारे चकटफु करू शकता ...अट फक्त एकच. तुमचा ईमेल पत्ता जीमेलचा असायला हवा. कारण पेज तयार करताना तो वापरावा लागतो. गुगलने एक गोष्ट चांगली केली आहे. ती म्हणजे गूगलच्या कोणत्याही सेवा वापरायच्या असल्या तरी एकच जीमेल पत्ता व त्याचा पासवर्ड पुरतो.

तुुम्हाला पेज तयार करायचे असेल तर गूगलपेजेस डॉट कॉम या साइटवर जा. तिथे जीमेलचा पत्ता टाइप करा आणि जीमेलचाच पासवर्ड द्या. नंतर तुम्ही गुगल पेज क्रिएटरवर जाल. तिथे वेबपेजचे हेडिंग कसे द्यायचे, खालील मजकूर कसा तयार करायचा, फोटो इन्सर्ट करायचे असले तर कसे करायचे याच्या अत्यंत सोप्या भाषत्ेा सूचना दिलेल्या आहेत. त्या पाळा आणि वेबसाइट तयार करा. स्वत:चा ब्लॉग तयार करण्यासंबंधी मी काही महिन्यांपूवीर् लिहिले होते. तसा ब्लॉग तयार केला असलात तर त्याची लिंक इथे देऊ शकता. नाहीतर हे वेबपेज इंटरअॅक्टिव्ह होऊ शकणार नाही. ब्लॉग नाही तर तुमचा ईमेल अथवा अन्य काही लिंक द्यावी लागेल. तरच लोक तुमच्याशी संवाद साधू शकतील. अर्थात गुगलपेजेसवर पान तयार करतानाच तुम्हाला 'ईमेल दिल्यास स्पॅममेल (जंकमेल... नको असलेल्या, व्हायरस असलेल्या मेल्स) पाठविणाऱ्यांना मोकळे रान मिळेल', असा वैधानिक इशारा देऊन ठेवलेला आहे. पण तसे पाहिले तर ब्लॉग अथवा कोणतीही लिंक दिली की हा प्रश्न येणारच. त्यामुळे इंटरअॅक्टिव्ह व्हायचे तर स्पॅममेलचा धोका पत्करावा लागेल. या स्पॅममेलपासून कम्प्युटरला धोका पोचू नये असे वाटत असेल तर मशीनमधला अँटीव्हायरस तसाच मजबूत हवा हे लक्षात घ्या. इंटरअॅक्टिव्ह होण्याचे आणखी काही प्रकार म्हणजे सोशल नेटवकिर्ंगमध्ये भाग घेणे. हे सोशल नेटवकिर्ंग म्हणजे ऑर्कुट, फेसबुक, हायफाइव्ह वगैरे. प्रत्येकात फायदेतोटे आहेतच. कॉलेजमधला तरुणवर्ग या साऱ्याच्या फारच जवळ आहे. वडीलधाऱ्या मंडळींनीही या प्रकारांशी जुळवून घ्यायला हरकत नाही. मला ऑर्कुटवर खूप जुने मित्र भेटले. काही अनोळखी लोकांनी मी ज्या 'प्रार्थना समाज' शाळेत होतो त्या शाळेची नोंद पाहून शाळेची आस्थेने चौकशी केली. सोशल नेटवर्कवरच्या कम्युनिटीज काही वेळेला खूपच फायदेशीर ठरतात. जग आणखी लहान करायला त्यांनी मदतच केली आहे.

इंटरअॅक्टिव्ह होण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे उपलब्ध असलेले वेगवेगळे मेसेंजर. गूगल, याहू, एओएल, हॉटमेल यांचे मेसेंजर जगाच्या दुसऱ्या टोकाला असणाऱ्या माणसाबरोबरही संवाद घडवून आणू शकतात, तोही लाइव्ह. त्यामुळे आज माणसे फक्त शारीरिकरीत्या वेगवेगळी आहेत एवढेच. बाकी इंटरनेटने त्यांना केव्हाच एक कम्युनिटी केले आहे.

तुमचा कम्प्युटर जितका अद्ययावत तितके इंटरअॅक्टिव्ह व्हायला अधिक सोपे. जुन्या एसडी रॅमचा जमाना आता गेला. आता कोअर टु ड्युओ आणि सेव्हन आय इंटेल प्रोसेसरचा जमाना आहे. यात मशीन खूप फास्ट चालते. तुमच्याकडे ब्रॉडबँड कनेक्शन असले तर दुधात साखरच. पाच-सात वर्षांपूवीर्चे मशीन आताच्या सॉफ्टवेअरनेे चालत नाही. सारखे क्रॅश होते. त्यामुळे अशा मशीनला अपडेट करणे केव्हाही चांगले. चांगल्या कॉन्फिगरेशनचे मशीन साधारण २५ हजारांपर्यंत मिळू शकते. फक्त एकच धोका आहे. तुमच्याकडे विंडोजची ओरिजिनल सीडी असली तरी ती नव्या कॉन्फिगरेशनच्या मशीनला चालेल असे नाही. किंबहुना चालणारच नाही. कारण बऱ्याच वेळा ती तुमच्या जुन्या मशीनच्या मदरबोर्डाशीच कम्पॅटिबल असते. मदरबोर्ड बदलला की विंडोजचे नवे सॉफ्टवेअरही घ्यावे लागेल अशी शक्यता आहे. मग विंडोज व्हिस्ता घ्यायचे की विंडोज सेव्हनसाठी थांबायचे ते तुम्हीच ठरवा. काहीही घेतलेत तरी मशीन वेगवान होईल आणि चॅटिंग वा सफिर्ंग करायचा आनंद दुप्पट नव्हे, चौपट होईल हे नक्की.

स्वत:चे लेटरहेड!

वर्डचा उपयोग करून अनेक गोष्टी आपल्याला करता येतात. अगदी स्वत:चे किंवा स्वत:च्या कंपनीचेलेटरहेडसुद्धा बनविता येते. त्यासाठी काय करावे लागते, त्याचा वेध...

आज इंटरनेटवर कितीही फ्री वर्ड सॉफ्टवेअर उपलब्ध असले तरी आपल्याला मायक्रोसॉफ्ट वर्डची सवयलागलेली आहे. मायक्रोसॉफ्ट वर्डला पर्याय कोणते ते यापूवीर् आपण एका लेखात पाहिले आहे. पण या वर्डचाउपयोग आणखी किती पद्धतीने करता येतो हे फारजणांना माहीत नसते. मजकूर ऑपरेट करायला, त्यात एखादाचार्ट अथवा टेबल इन्सर्ट करायला, तसेच फोटो टाकायला वर्ड उपयोगी पडते. त्याचप्रमाणे मागील लेखातम्हटल्याप्रमाणे लेटरहेड तयार करायलाही उपयोगी पडते. यासाठी कोणी आटिर्स्ट मदतीला असण्याची गरजनाही.

प्रथम मायक्रोसॉफ्ट वर्ड ओपन करा. वरती डाव्या बजूला फाइल, एडिटच्या रांगेत तिसरे बटन व्ह्यू असेअसेल. त्यावर क्लिक करा. नंतर त्यातील हेडर अँड फूटरवर क्लिक करा. आपोआप तुमच्या ओपनफाइलमध्ये एक बॉक्स दिसेल. त्यात तुमचे नाव, आवश्यक असल्यास एखादे स्लोगन, स्वत:चे नाव द्यायचेनसल्यास कंपनीचे नाव टाइप करा. ते झाल्यावर वरच्या टूलबारमधून ते सेंटरला आणा. (बी आय यू याबटनांच्या लाइनमध्ये पुढे सेंटरचे बटन आहे) तुम्हाला वरच्या भागात तुमचा स्वत:चा फोटो अथवा कंपनीचालोगो इन्सर्ट करायचा असल्यास तोही करा. मात्र हा लोगो अथवा फोटो तुमच्या मशीनमध्ये आधी सेव्हकरायला लागेल. जिथे तो इन्सर्ट करायचा असेल तिथे माऊसचा कर्सर न्या आणि वरती डावीकडे व्ह्युनंतरअसलेल्या इन्सर्ट बटनावर क्लिक करा. तिथे बरीच ऑप्शन्स असतील. अगदी तारीखही इन्सर्ट करता येईल, पेज नंबर टाकता येईल अथवा एखादा डायग्रामही टाकता येईल. पण तुम्हाला आत्ता फोटो टाकायचा असल्यानेइन्सर्ट पिक्चर'वर क्लिक करा. मग तो फोटो कुठे सेव्ह केला आहे तिथे जाऊन तो अपलोड करा. तो फोटोदिसायला लागल्यावर ज्या जागेवर असणे आवश्यक आहे तिथे नेऊन ठेवा. आणखी काही तपशील हेडिंगमध्येद्यायचा असेल तर तो द्या, त्याचा फाँट साइझ कमीजास्त करा.
'

हे झाले लेटरहेडच्या वरच्या भागाचे. आता तळाला तुमचा वा कंपनीचा पत्ता आणि फोन नंबर देता येईल. त्यासाठी 'हेडर अँड फूटर' या पट्टीतच 'स्विच बिटविन हेडर अँड फूटर' यावर क्लिक करा. की पानाच्या तळालाबॉक्स तयार होईल. त्यात पत्ता इतर तपशील द्या. त्याचा लेआऊटही आवश्यकतेनुसार करा. हे झाले कीसारे पान सेव्ह करायला हवे. इथे विशेष खबरदारी घ्यावी लागेल. लेटरहेडच्या 'फाइल'मध्ये जा, 'सेव्ह अॅज' म्हणा फाइल 'डॉक्युमेंट टेम्प्लेट' म्हणजेच डॉट फाइल म्हणून सेव्ह करा. डॉक किंवा आरटीएफ वगैरे सेव्हकरू नका. म्हणजेच फाइलला तुम्ही लेटरहेरड असे नाव दिले असेल तर 'लेटरहेड.डॉट' अशी फाइल तयार होईल. ती सेव्ह कुठे कराल? हार्डडिस्कच्या (उदा. सी ड्राइव्ह) ड्राइव्हमध्ये टेम्प्लेट असा वेगळा फोल्डर असेलत्यात सेव्ह करा. साऱ्या डॉट फाइल यातच सेव्ह केल्या तर शोधाशोध करायला लागणार नाही. या फाइलची एककॉपी डेस्कटॉपवर करून ठेवा. जेव्हाकेव्हा लेटरहेडवर काही मजकूर टाइप करायचा असेल, तेव्हा डेस्कटॉपवरचीफाइलच ओपन करा त्यात टाइप करा. तुमच्याकडे कलर प्रिंटर उपलब्ध असेल तर चांगलेच; नसला तरीब्लॅक अँड व्हाइट प्रिंटरवरही स्वत:च्या लेटरहेडवरचे पत्र चांगलेच दिसेल.

लेटरहेडच्या मांडणीत आणखी विविधता आणायची असेल तर मायक्रोसॉफ्ट वर्डमध्येच वरती फाइल, व्ह्यूच्याच ओळीत फॉरमॅट म्हणून बटन असेल. (वर्ड २००३मध्ये ते आहे) त्यावर क्लिक केलेत की खालीथीम' असे दिसेल. त्यातली कोणतीही थीम निवडा त्याप्रमाणे लेटरहेड तयार करा. एकच थीम कायमठेवायची नसेल तर लेटरहेड थीमशिवाय तयार करा पत्र पाठवतेवेळी वेगवेगळी थीम द्या. वर्डमध्ये कामकरायला वेगळीच गंमत येईल.
'

सावधान

तुमच्या इमेल इनबॉक्समधे आलेला एखादा इमेल तुमचं फार मोठं नुकसान करू शकतो. कारण पैसे कमवण्यासाठी जगभरातील अनेक लोक सध्या भन्नाट शकला लढवत आहेत. यातील काही माकेर्टिंग टेक्निकचा वापर चांगल्यासाठी, तर काही फसवण्यासाठी करत आहेत. चांगल्या-वाईटाच्या या ऑॅनलाइन लपंडावात तुम्ही अडकू नये, यासाठी आजच्या टेकट्रिक्स...

* एखाद्या इमेलवरून ते मेल पाठवणारी व्यक्ती तीच आहे, हे सिद्ध होत नाही. म्हणजेच कुणीही कोणाच्याही नावाने इमेल अकाऊण्ट उघडू शकतो.

उदा. हिटलर जरी सध्या नसला तरी त्याच्या नावाने सध्या बऱ्याच लोकांचे इमेल आहेत. अशाच इमेलचा आणि महत्त्वाच्या लोकांच्या अथवा कंपनीच्या नावाने इमेल अकाऊण्ट बनवून लोकांना फसवले जातं. बिल गेट्सच्या नावाने असेच काही मेल मध्यंतरी फिरत होते.

* असे इमेल पाठवणाऱ्यांनी माणसाच्या मानसिकतेचा पक्का अभ्यास केलेला असतो. म्हणूनच तुम्हाला जवळचं वाटावं, अशा नावाने तुम्हाला मेल येऊ शकतो. तसंच त्यातील मजकूर वाचण्याचा केलेला प्रेमळ आग्रह असू शकतो. या अशा मेलपासून कायम सावध राहा.

* बऱ्याचदा आपल्या एखाद्या मित्रमैत्रिणीकडून असा मेल फॉरवर्ड म्हणून येऊ शकतो. त्यामुळे तो नक्कीआपल्याच माणसाने पाठवलाय का, याची खात्री करून घ्या. सर्वात मुख्य म्हणजे त्यात काही पैशाचे व्यवहार असतील, तर ते करण्याआधी फोन, इमेल रिप्लाय आदी पद्धतीने खात्री करून घ्या.

* कधीकधी याहू.कॉम अथवा गुगल.कॉम अशा नावाने इमेल बनवून तो पाठवला जातो. कंपनीच्या नावाने असलेला हा मले आपण बऱ्याचदा उघडून पाहतो. त्यात तुमची निवड झालीय किंवा अमकीतमकी ऑॅफर आहे, असं काही असेल तर त्याला बळी पडू नका. कारण हा मेल जगातील लाखो लोकांपर्यंत पोहोचलेला आहे आणि त्याला भुलणारा लुटला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

* शक्यतो इमेलच्या विषयामधून अनेक इमेलचा अंदाज येऊ शकतो. आजारपणासाठी मदत हवीय, तुमची लकी ड्रॉमधे निवड झालीय, मला काही रक्कम भारतात पाठवायचीय मदत कराल का, मला तुमचं नाव तुमच्या या मित्राने सुचवलंय की तुम्ही मला आथिर्क मदत कराल... अशा आशयाचे इमेल बऱ्याचदा फसवणारे असू शकतात.

* असे इमेल आल्यास त्यापासून वाचण्याचा सर्वात चांगला उपाय म्हणजे डीलीटचं बटण. असे मेल लगेच डीलीट करून टाका. शक्यतो डीलीट करण्याआधी तो अॅड्रेस स्पॅम म्हणून तुमच्या मेलला कळवून टाकावा. जेणेकरून पुढील वेळी त्याच पत्त्यावरून तुम्हाला पुन्हा मेल येणार नाही.

* तुमच्या इमेल अकाऊण्टची सिक्युरिटी नीट तपासा. प्रत्येक इमेल अकाऊण्मधे उपदवी मेल टाळण्यासाठी सेटिंग्ज उपलब्ध असतात. त्यांचा वापर करून असल्या इमेलपासून वाचता येतं.

* अनेकदा काही इमेलमधे अमुकतमुक लिंकवर जाऊन रजिस्टर करा किंवा ही फाइल डाऊनलोड करून रन करा, असे इमेल येतात. असे मेल आधी व्हायरस स्कॅन करून घ्यावेत. अन्यथा त्यात दडलेला व्हायरस तुमच्या कम्प्युटरचे तीनतेरा वाजवू शकतो.

* शेवटचं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे असले मेल फॉरवर्ड करू नका. इतरांनी तरी फसावं म्हणून त्यात तुमच्या मित्रांना पाठवण्याचा आग्रह असतो. त्यामुळे तुम्ही ज्यांना मित्र म्हणता त्यांना असल्या प्रकरणात गुंतवू नका.

ऑनलाइन शॉपिंग फण्डा

ट्रॉली घेऊन मॉलमध्ये किंवा मोठमोठ्या पिशव्या घेऊन बाजारात शॉपिंग करण्यात काही वेगळीच मजाअसते. पण आज २४ बाय लाइफस्टाइलमधे प्रत्येकाला ते शक्यनाही. त्यामुळे ऑफिसच्या लंचटाइममध्ये किंवा संध्याकाळी घरीइण्टरनेटवर शॉपिंग करणाऱ्यांचीसंख्या झपाट्याने वाढतेय. क्रेडिटकार्डचा वापर करून होणाऱ्या याशॉपिंगमधे फसवणूक होण्याचीशक्यता असते. ही फसवणूक टाळूनसिक्युअर ऑनलाइन शॉपिंगचे फण्डेसांगणा - या आजच्या टेकट्रिक्स...

* सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा पासवर्ड कोणाशीच शेअर करू नका. आपण आपल्या जवळच्या माणसाला पासवर्ड शेअर करतो, पण त्या वेळी इतर कोणी तो ऐकला तर गोंधळ होऊ शकतो. पासवर्ड हा शक्यतो शब्द आणि अंक यांचं कॉम्बिनेशन असू द्या. आपण बऱ्याचदा एखादं नाव वगैरे पासवर्ड ठेवतो. असा पासवर्ड की-बोर्डवरील ऑपरेटिंगवरून ओळखणं शक्य होतं. म्हणूनच गुंतागुंतीचा पासवर्ड लक्षात ठेवायला अवघड असला तरी सुरक्षित ठरतो.

* शक्यतो आपली वैयक्तिक माहितीकोणत्याही साइटवर देऊ नका. जिथेती द्यावीच लागेल, त्या साइटची सिक्युरिटी आणि विश्वासार्हता तपासून घ्या. बऱ्याच ऑनलाइन शॉपिंग साइट आता द्धह्लह्लश्चह्य तंत्र वापरतात. यातील शेवटच्या 'एस'चा अर्थ सिक्युअर असा असतो. तुम्ही जी वैयक्तिक माहिती देता, तिचा ती साइट गैरवापर करणार नाही याची काळजी घ्या. म्हणूनच जेवढी बंधनकारक आहे, तेवढीच माहिती द्या.

* आपल्याला बऱ्याचदा ऑनलाइन शॉपिंगसंदर्भात इमेल येत असतात. या इमेलमधे काहीतरी स्कीम्सची लालूच दाखवून एखादा फॉर्म भरून मागितला जातो. शक्यतो अशा इमेलना रिस्पॉन्स देऊ नका. समजा आवश्यक असेल, तरी वैयक्तिक माहिती देणं टाळा.

* ऑनलाइन शॉपिंग करताना तुमचा अॅण्टिव्हायरस, अॅण्टिस्पायवेअर, फायरवॉल इत्यादी सुरक्षाव्यवस्था अपडेट आहेत, याची काळजी घ्या.

* ऑनलाइनवर केलेल्या व्यवहारांची नोंद ठेवा. या संदर्भात येणारी पत्रं, पावत्या, ई-मेल जपून ठेवा.

* शक्य असल्यास ऑनलाइन शॉपिंगसाठी एक स्वतंत्र इमेल अकाऊण्ट ओपन करा. म्हणजे ते तुमच्या ऑनलाइन शॉपिंगचं पासबूक बनेल. तसंच इतर ई-मेलमधे हे मेल मिक्स होऊन गोंधळ होणार नाही.

* बँकेची कार्डस्, अकाऊण्ट्स कायम चेक करत राहा. विशेषत: जर तुम्ही नियमित ऑनलाइन शॉपिंग करत असाल, तर हे चेकिंग मस्ट आहे. तुमच्या अकाऊण्टचा कोणी गैरवापर करत नाही ना, याची कायम काळजी घ्या. जर अशा काही संशयास्पद ट्रान्झॅक्शन आढळल्या, तर आधी बँकेला आणि मग पोलिसांना कळवा.


* ज्या साइटना मान्यता आहे त्याच साइटवरून ऑनलाइन शॉपिंग करा. अत्यंत नवख्या आणि संशयास्पद साइटवरून शॉपिंग करणं टाळा. शक्यतो ज्या कंपन्यांचं कार्यालय आपल्या शहरात आहे किंवा जिथे जाणं शक्य आहे त्याच साइटवरून खरेदी करा. मुंबईत बसून दुबईतील साइटवरून शॉपिंग करू नका, तक्रार करणं अवघड होऊन बसतं.

* प्रत्येक साइटची एक प्रायव्हसी पॉलिसी असते. आपण बऱ्याचदा ती वाचणं टाळतो. पण त्यात कदाचित एखाद्या नियमांमधे गोची असू शकते. त्यामुळे शक्य असल्यास आपण ज्या साइटवरून नियमित खरेदी करणार आहोत, त्या साइटची प्रायव्हसी पॉलिसी वाचून घ्या.

* नाव सारख्या असणाऱ्या ड्युप्लिकेट साइटपासून दूर राहा. बऱ्याचदा प्रतिष्ठित कंपनीच्या नावापुढे किंवा मागे काहीतरी लावून डुप्लिकेट साइट केली जाते. त्यामुळे आपण जिथून खरेदी करतो आहोत, ती साइट अधिकृत आहे ना, याची खात्री करून घ्या.

* एवढ्या साऱ्या सूचना असल्या तरी ऑनलाइन शॉपिंग म्हणजे कटकट आहे, म्हणून त्यापासून लांब राहू नका. शेवटी ही हायटेक इन थिंग आहे. ती आपल्याला शिकून घ्यावी लागेलच.

वर्डची उघड गुपिते!

ऑडिओ किंवा व्हीडिओ फाइल आपल्या कम्प्युटरमध्ये घालता येतात. मात्र त्याचंही एक तंत्र आहे. ते समजून घेतलं की या प्रकारातल्या फाइल कम्प्युटरमध्ये घालणं अगदीच सोप्पं होऊन जातं. पण याच नाहीत, तर अगदी एक्सेलशीट जरी टाकायची ठरवली, तरी तीसुद्धा टाकता येणं सहजशक्य आहे. मात्र या साऱ्याचा मंत्र नीटपणं माहीत असणं आवश्यक आहे...

तुम्ही वर्ड २००३मध्ये एखादी वर्ड फाइल तयार करत आहात; पण त्यात नुसताच मजकूर भरून ती फाइल रटाळ करण्याऐवजी मध्येमध्ये काही फोटो, काही व्हीडिओ फाइल्स, काही नुसत्याच वेगवेगळ्या आवाजाच्या फाइल्स अशा घातल्या तर? जरा गंमत येईल. या आवाजाच्या फाइल्स तुमच्या स्वत:च्या आवाजातल्याही असू शकतील. अगदी मोबाइलवर रेकॉर्ड केलेल्या फाइल्स तुम्ही वर्ड फाइलमध्ये घालू शकाल. हे करणे अगदी सोपे आहे. ज्या मजकुरानंतर ऑडिओ फाइल टाकायची आहे, तिथे माऊसचा कर्सर न्या. नंतर वरती 'इन्सर्ट' मेन्यूमधून 'ऑब्जेक्ट' असे ऑप्शन निवडा. ऑब्जेक्ट डायलॉग बॉक्स ओपन झाला की त्यात 'क्रिएट फ्रॉम फाइल' या नावाच्या टॅबवर क्लिक करा. नंतर ब्राऊजवर क्लिक करून तुम्ही कम्प्युटरमध्ये ज्या फोल्डरमध्ये ऑडिओ फाइल ठेवली असेल तिथे जा व त्यातील हव्या असलेल्या फाइलवर क्लिक करा व ओके म्हणा. वर्डमधल्या मजकुरापाशी एक आयकॉन दिसेल. त्याचे स्वरूप एखाद्या स्पीकरसारखे असेल. त्या आयकॉनवर डबलक्लिक केल्यास आवाज स्पष्टपणे ऐकू येईल.

या ऑडिओफाइल्स तुमच्या मशीनमध्ये आधी डाऊनलोड केलेल्या असल्या पाहिजेत. मोबाइलवरचे रेकॉडिर्ंग असले तर मोबाइलच्या डाटाकेबलच्या मदतीने ती फाइल मशीनमध्ये टाकली पाहिजे. इंटरनेटवरून एखादे गाणे डाऊनलोड केलेले असले तर ते मशीनमध्ये तुम्ही निवडलेल्या फोल्डरमध्ये सेव्ह केलेले असेलच.

हे झाले ऑडिओ फाइलचे. अशाच पद्धतीने व्हीडिओ फाइलही टाकता येईल, साधे चित्र टाकता येईल वा दुसऱ्या एखाद्या फाइलची लिंक द्यायची असली तरी ती देता यईल. तुमच्या एखाद्या आवडत्या व्यक्तीला तुमच्या आवाजातला संदेश पाठविण्याचा हा एक वेगळा मार्ग म्हणायला हवा. एक गोष्ट मात्र लक्षात घ्या. जितक्या जास्त ऑडिओ वा व्हीडिओ फाइल्स तुम्ही इन्सर्ट कराल, तेवढा तुमच्या वर्ड फाइलचा साइझ वाढेल. आणि मग कदाचित साध्या ईमेलवरून पाठविताना त्रास होईल. तेव्हा, किती मोहात पडायचे याचा विचार आधी करा!

या फाइल्स झाल्या केवळ विरंगुळा म्हणून टाकण्यासाठी. परंतु, एखादी खरोखरच महत्त्वाची फाइल टाकायची असली आणि ती टेबल अथवा एक्सेल शीट असली तर? तीही टाकता येईल. वर्ड २००३च्या मेन्यूबारमध्येच एक्सेलशीटचे चित्र असलेले आयकॉन असते. त्यावर कर्सर नेलात की 'इन्सर्ट मायक्रोसॉफ्ट एक्सेल वर्कशीट' असे दिसेल. त्यावर क्लिक करा. एक चार्ट समोर येईल आणि या शीटचा आकार किती बाय किती कॉलम हवा ते विचारले जाईल. तुम्हाला हवा तो साइझ निवडा. ओके म्हटल्याबरोबर तुम्ही वर्ड फाइलमध्ये ज्या ठिकाणी कर्सर ठेवला असेल तिथे ही एक्सेलशीट दिसेल. तीत मजकूर भरा की मूळ साध्या मजकुराच्या फाइलला एकदम वजन प्राप्त होईल. एक्सेलच्याच बाजूला इन्सर्ट टेबल असे ऑप्शन आहे. एक्सेलशीट अवघड वाटत असली तर हे टेबल इन्सर्ट करा. इन्सर्ट करतानाही किती साइझचे टेबल हवे आहे ते विचारले जाईलच. मग हवे तेवढेच निवडा. त्याच ओळीत इन्सर्ट हायपरलिंक असेही ऑप्शन आहे. तिथे एखाद्या फाइलची लिंक देता येईल. ऑप्शनवर क्लिक केल्यास एक डायलॉग बॉक्स ओपन होईल. त्यातून हव्या त्या फोल्डरला जा आणि हवी ती फाइल निवडा व ओके म्हणा. ती फाइल निळ्या रंगात तुमच्या वर्ड फाइलमध्ये दिसेल. ती लिंक ओपन करायची असेल तर 'कंट्रोल' बटन दाबून मग लिंकवर डबलक्लिक करा. ती फाइल थेट ओपन होईल. आता मायक्रोसॉफ्ट वर्डला ओपन ऑफिससारखे अनेक पर्याय उपलब्ध असले तरी वर्डची उपयुक्तता कमी झालेली नाही. घरच्याघरी त्यावर अनेक गोष्टी करता येतात. स्वत:चे लेटरहेड तयार करता येते किंवा वर्ड फाइलमधला मजकूर कसा दिसावा हेही ठरवता येते म्हणजेच त्याची 'थीम' ठरवता येते. मग साधा वाटणारा मजकूर एकदम आकर्षक होतो.

नेटवरचा खेळ!

विश्वनाथन आनंद याचा अजिंक्यपदापर्यंतचा प्रवास लाखो लोकांनी लाइव्ह पाहिला, तो इंटरनेटच्या माध्यमातून. पण केवळ बुद्धिबळच नाही, तर क्रिकेट आणि लॉन टेनिस, फुटबॉल आणि बास्कटेबॉल अशा खेळांच्याही साइटस आता आहेत आणि त्यावरून क्रीडारसिकांना अगदी भरभरून माहिती सतत मिळत असते...

भारताचा बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद पाडव्याच्या दिवशी पुन्हा एकदा र्वल्ड चँपियन झाला आणि आपल्याकडे खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी झाल्यासारखी वाटली. आनंद काही पहिल्यांदा र्वल्ड चँपियन बनला नव्हता, तरीही एकदा मिळवलेले विजेतेपद टिकविण्यासाठी अधिक श्रम करावे लागतात. ते त्याने केले आणि विजेतेपद टिकविले, हे स्पधेर्च्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या काहीशे लोकांनी पाहिले आणि जगभरातील लाखो बुद्धिबळ रसिकांनी पाहिले. जगभरातील लोक हे पाहू शकले याचे कारण एकच. इंटरनेट. बुद्धिबळ महासंघाच्या www.fide.com या साइटवरून लोकांनी आनंद आणि क्रामनिक या दोघांची प्रत्येक मूव्ह पाहिली, त्यावरून मनातल्या मनात दोन्ही खेळाडूंच्या पुढच्या चाली काय असतील याचा अंदाज केला. म्हणजेच प्रेक्षकांचे नकळत चांगले प्रशिक्षण झाले.

इंटरनेटवरून क्रीडा क्षेत्रातल्या घडामोडींची लाइव्ह माहिती मिळण्याची सोय आज नव्याने झालेली नाही. पण बुद्धिबळाच्या सामन्यातील प्रत्येक चाल पाहताना जी मजा येते, ती अन्य कोणत्याही खेळात येत नाही. तसे पाहता क्रिकेटपटूंची http://www.cricinfo.com/ ही अत्यंत आवडती साइट आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात कोठेही प्रथम श्रेणीचे क्रिकेट चालू असले वा या खेळासंबंधी काहीही घडामोडी होत असल्या तरी या साइटवर त्याची माहिती ताबडतोब मिळणारच, असा विश्वास प्रत्येकाच्या मनात आहे. प्रत्येक खेळाडूची अगदी अपटूडेट आकडेवारी, त्याचे पूर्ण प्रोफाइल, देशाची माहिती आणि प्रत्येक स्थानिक स्पधेर्चा तपशील ही साइट देते.

पूवीर्च्या काळी (म्हणजे अगदी पाच वर्षांपूवीर्पर्यंत) काही उत्साही लोकांना वहीत प्रत्येक देशाच्या टेस्ट वा वनडे मॅचेस यांची माहिती लिहून काढण्याचा छंद होता. पण गेल्या काही वर्षांत क्रिकेट एवढे वाढले की असे घरच्या घरी रेकॉर्ड ठेवायचे म्हणजे नोकरीधंदा सोडून घरी बसण्याची पाळी. इंटरनेटमुळे आणि क्रिकइन्फोमुळे हा सारा प्रश्न सुटला आहे.

अर्थात क्रिकेटबद्दल ही एकच साइट अस्तित्वात आहे असे मात्र नाही. त्याची कितीतरी उदाहरणे देता येतील. प्रत्येकाचे काही ना काही तरी वैशिष्ट्य आहेच. पण 'क्रिकइन्फो' ही 'दादा' साइट आहे. बुद्धिबळाचेही तसेच. या खेळाच्या असंख्य साइट्स असल्या तरी अधिकृत असलेली www.fide.com ही साइटच मोठ्या प्रमाणावर पाहिली जाते. या साइटचे वैशिष्ट्य म्हणजे या खेळासंबंधी मूलभूत माहिती, खेळाचा इतिहास, टॉप प्लेअर्स, त्यांची माहिती, बुद्धिबळातल्या रेटिंग्जची माहिती, महत्त्वाच्या असणाऱ्या स्पर्धा, त्यांचे निकाल आदि संपूर्ण माहिती या साइटवर मिळते. जगातील प्रमुख बुद्धिबळ संघटना म्हणून या साइटला मान असला तरी अन्य लहानसहान संघटनांनी काढलेल्या वा खाजगीरीत्या चालणाऱ्या साइट्स आहेतच. प्रत्येक देशाच्या बुद्धिबळ संघटनेची साइट असते; शिवाय काही खेळाडूंनी स्वत:च्या खाजगी साइटही बनविल्या आहेत. क्रिकेटबाबतही तसेच. प्रत्येक देशाच्या क्रिकेट मंडळाची स्वत:ची अधिकृत साइट आहे. त्यावर त्या देशातल्या स्थानिक स्पर्धांबाबत अधिक तपशील मिळू शकतो. भारतीय क्रिकेट मंडळाची अधिकृत साइट http://www.bcci.tv/ ही आहे. उदा. एखाद्या संघात एखादा नवोदित खेळाडू आला, तर त्याची जुजबी माहिती वर्तमानपत्रांना देण्यात येते. पण त्याची खरी माहिती पाहायची असेल, तर अशा साइट्स उपयोगी पडतात.

जे क्रिकेट व बुद्धिबळाचे, तेच अन्य खेळांचे. फुटबॉल, बास्केटबॉल, लॉन टेनिस (विम्बल्डनची साइट http://www.wimbledon.org/ en_GB/index.html) बॅडमिंटन ( http:// www.badmintonindia.org /home.html) या सर्वांच्या प्रमुख संघटना, प्रत्येक देश, त्या देशांची प्रमुख संघटना आणि बऱ्याच वेळेस राज्यांच्या संघटना यांच्याही साइट्स आहेत. टीव्हीवर एखादी मॅच लाइव्ह पाहात असताना मजा येते खरी; पण एखाद्या बाबीविषयी बॅकग्राऊंडर हवा असेल तर इंटरनेटचाच आधार घ्यावा लागतो. शिवाय प्रत्येक इंग्रजी वृत्तपत्रांच्या साइटवर क्रीडा विषयक बातम्यांसाठी वेगळी लिंक दिलेली असते. उदा. टाइम्स ऑफ इंडियाची क्रीडाविषयक लिंक http:// sports.timesofindia.indiatimes.com/ अशी आहे.

जगभरातून क्रीडाप्रेमी वेगवेगळ्या खेळांच्या साइटवर लॉगीन करत असतात. काहींना भारत-ऑस्ट्रेलिया कसोटीचा लाइव्ह स्कोअरबोर्ड पाहावासा वाटतो, तर काहींना विम्बल्डन मॅचेसचा पॉईंट बाय पॉईंट आढावा घ्यायचा असतो, तर काहींना आनंदची जगज्जेतेपदाच्या दिशेने चाललेली वाटचाल पाहायची असते. खेळ कोणताही असो, इंटरनेट तुमच्या सेवेसाठी हजर आहे.

विण्डोज Xp मधला लपाछपीचा खेळ

आपला कम्प्युटर हा हत्तीसारखा असतो... त्याचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे... कारण या कम्प्युटरमध्ये अनेक प्रोग्राम्स दडलेले असतात. जे वापरण्यासाठी आपले नेहमीचे आयकॉन किंवा स्टार्ट बटन-प्रोग्राम असा रस्ता चालत नाही. त्यासाठी काही छुपे रस्ते असतात. या छुप्या रस्त्यांवरून जर आपण हा लपाछपीचा खेळ खेळला तर अनेक गोष्टी सापडू शकतात.

आज आपल्याकडे बहुसंख्य कम्प्युटरमध्ये विण्डोज xp ही ऑपरेटिंग सिस्टम वापरलेली असते. या ङ्गक्क मध्ये दडलेले अनेक प्रोग्राम्स शोधण्यासाठी आजच्या टेकट्रिक्स... यात आपण अशा काही कमाण्ड समजून घेऊ, ज्यामुळे आपण टेक्नोसॅवी कॉम्पयुझर म्हणून कॉलर टाइट करू शकू. यासाठी खाली दिलेल्या कमाण्ड वापरून तर बघा.

विण्डोजमधील स्टार्ट बटणावरील Run वर क्लिक करा. त्यानंतर येणाऱ्या विण्डोमध्ये खाली दिलेल्या प्रोग्रामच्या शॉर्टकट टाइप करून एण्टर मारल्यास तो प्रोग्राम सुरू होईल.

१.आपल्या की-बोर्डवर अनेक चिन्हं नसतात हे माहितेय... अशी अनेक निरनिराळी चिन्हं आणण्यासाठी Run विण्डोमध्ये charmap ही कमाण्ड देऊन तर बघा.

२.कम्प्युटरमधील अनावश्यक फाइली नष्ट करणारा प्रोग्राम सुरू करण्यासाठी : cleanmgr

३.कॉपी केलेली गोष्ट पाहण्यासाठी तसंच साठवण्याचा प्रोग्राम सुरू करण्यासाठी : clipbrd

४.विशिष्ट प्रोग्राममधील प्रॉब्लेम शोधणारा प्रोग्राम सुरू करण्यासाठी : drwtsn32

५.कम्प्युटरमधील साऊण्ड आणि व्हिडीओ कार्डबद्दलची माहिती पाहण्यासाठी : dxdiag

६.स्वत:चा नवीन अक्षर तयार करण्यासाठीचा प्रोग्राम सुरू करण्यासाठी ( Private character editor ) : eudcedit

७.आपणहून उघडणारा आणि इन्स्टॉल करणारा प्रोग्राम सुरू करण्यासाठी ( IExpress Wizard ) : iexpress

८.नेटवर्किंगमध्ये असलेल्या कम्प्युटरमधील फाइल्स ऑॅफलाइन असताना एकत्र करण्यासाठीचा प्रोग्राम सुरू करण्यासाठी ( Microsoft Synchronization Manager ) : mobsync

९.विण्डोज मीडिया प्लेअरचं जुनं व्हर्जन सुरू करण्यासाठी ( Windows Media Player 5.1 ) : mplay32

१०. आपल्या कम्प्युटरमधील अंतर्गत व्यवस्थेची माहिती पाहण्यासाठीचा प्रोग्राम सुरू करण्यासाठी : packager

११. विण्डोजमधील सॉफ्टवेअरच्या अंतर्गत नोंदी पाहण्यासाठी : regedt32 किंवा regedit

१२. नेटवर्किंगमध्ये असलेल्या कम्प्युटरमध्ये देवाण-घेवाणीचा फोल्डर बनवण्यासाठी : shrpubw

१३. कम्प्युटरमधील डिजिटल सिग्नेचर पडताळण्याचा प्रोग्राम सुरू करण्यासाठी ( File siganture verification tool ) : sigverif

१४. आवाज कमी-जास्त करण्याचा प्रोग्राम सुरू करण्यासाठी : sndvol32

१५. विण्डोजमधील सॉफ्टवेअर तसंच हार्डवेअरच्या ड्राइव्हर फाइली पडताळणारा प्रोग्राम सुरू करण्यासाठी : verifier

पॉवरटॉइज!

केवळ ब्राऊझर असून चालत नाही. प्रत्येकासाठी काही अॅडऑन्स म्हणजेच अतिरिक्त सोयी आवश्यक असतात. त्याही डाऊनलोड कराव्या लागतात. नाहीतर त्या ब्राऊझरच्या निर्मात्याने केलेला मूळ ब्राऊझरच तुमच्या वाट्याला येईल... इंटरनेटचा वापर करणाऱ्यांनी हे ध्यानात ठेवायलाच हवं...

इंटरनेटचा वापर करताना अनेक ब्राऊझर्स उपलब्ध आहेत. उदा. इंटरनेट एक्स्प्लोरर (आयई), फायरफॉक्स, गूगल क्रोम, फ्लॉक, सफारी, अवंती वगैरे. प्रत्येकाची स्वत:ची अशी खास वेशिष्ट्येे आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने फायरफॉक्स सर्वात चांगला आहे असे आतापर्यंतच्या पाहण्यांतून सिद्ध झालेले आहे. परंतु, केवळ ब्राऊझर असून चालत नाही. प्रत्येकासाठी काही अॅडऑन्स म्हणजेच अतिरिक्त सोयी आवश्यक असतात. त्याही डाऊनलोड कराव्या लागतात. नाहीतर त्या ब्राऊझरच्या निर्मात्याने केलेला मूळ ब्राऊझरच तुमच्या वाट्याला येईल. आयईसाठी आयई७प्रो डाऊनलोड केलेत की तुम्हाला तुमच्या मनासारखा ब्राऊझर मिळू शकेल. म्हणजे मूळ ब्राऊझरमध्ये तुम्हाला हव्या तशा सुधारणा करता येऊ शकतील. सध्या याची २.४ व्हर्जन उपलब्ध आहे. साइझ फक्त २.४ एमबी आहे. त्यामुळे डाऊनलोड करायला अगदी सोपा आहे. या अॅडऑनमुळे काय होते? मुख्यत: आयई ब्राऊझर हवा तसा कस्टमाइझ करता येतो. मात्र फक्त आयईसाठीच तो वापरता येईल. अन्य ब्राऊझरसाठी वेगवेगळ्या सुविधा डाऊनलोड कराव्या लागतील.

आयई७प्रो डाऊनलोड झाल्यावर ती फाइल 'रन' करा. त्याचे लायसन्स अॅग्रीमेंट मंजूर केलेत की हा प्रोग्राम आयईच्या तळाला उजव्या बाजूला आयकॉनच्या स्वरूपात दिसेल. त्यावर डबलक्लिक करा. एक विंडो ओपन होईल. त्यात अगदी डावीकडे बऱ्याच प्रकारचे ऑप्शन्स दिलेले दिसतील. त्यातील एकेकावर क्लिक केले की त्यातील उपऑप्शन्स उजव्या बाजूच्या खिडकीत ओपन होतील. त्यातील जी तुम्हाला आवश्यक वाटतील ती क्लिक वा अनक्लिक करा. उदा. 'शॉर्टकट कीज'वर क्लिक केल्यावर उजवीकडे बरेच शॉर्टकट दिसतील. किंवा 'अॅड ब्लॉकर'वर क्लिक केल्यावर बाजूच्या ऑप्शनमध्ये फ्लॅश ब्लॉक करायचाय का अथवा जाहिराती ब्लॉक करायच्या आहेत का हे विचारले जाते. 'ऑनलाइन सव्हिर्सेस'मध्ये गेल्यावर तुमचे बुकमार्कस् आपोआप सिंक्रोनाइझ करायचे आहेत का असे विचारले जाते. 'सर्च'वर गेल्यास डिफॉल्ट सर्च इंजिन कोणते हवे त्याप्रमाणे सेट करता येते. 'प्रायव्हसी'मध्ये तुमचा डाटा वा पासवर्ड सेव्ह करू नये असे आदेश तुम्ही देऊ शकता. अशा असंख्य सोयी तुम्हाला या आयई७प्रोमध्ये मिळतील.

तसे पाहता मायक्रोसॉफ्टने विंडोज कस्टमाइझ करण्यासाठी काही शक्तिशाली टूल्स उपलब्ध करून दिली आहेत. त्याला नावही 'पॉवरटॉईज' असे आहे. इंटरनेटवर विंडोज पॉवरटॉईज असा सर्च दिलात की या टूल्सची यादी तुमच्या समोर येतील. हे पॉवरटॉइज मायक्रोसॉफ्टने तयार केलेले नाहीत. त्यामुळे एक प्रकारचा अनधिकृतपणा त्याला आहे. पण घाबरायचे काहीच कारण नाही. यातला 'ट्विकयूआय' हे टूल वरील 'आयई७प्रो'सारखेच आहे. विंडोज सिस्टिम कशी चालावी याची सेटिंग्ज तुम्ही इथे करू शकता. या 'ट्विकयूआय'ची साइझ फक्त १४७ केबी असल्याने एका मिनिटात डाऊनलोड होऊ शकते.

' कलर कंट्रोल पॅनल अॅपलेट' हे टूलही उपयुक्त आहे. प्रत्यक्ष फोटोचा रंग, कम्प्युटरवर दिसणारे फोटोचे रंग आणि तो छापून आल्यावर दिसणारा रंग काहीवेळा वेगवेगळा असू शकतो. तो एकसारखाच असेल याची खबरदारी हे टूल घेईल. (प्रत्येक पॉवरटॉय डाऊनलोड केल्यावर त्याच्या सेटिंग्जमध्ये जाऊन आवश्यक ते बदल करता येतील.) क्लिअर टाइप ट्युनर हे टूल स्क्रीनवर दिसणारी अक्षरे स्पष्ट दिसण्यासाठी मदत करील. अल्ट व टॅब वापरून आपण ओपन डॉक्युमेंटस क्रमाक्रमाने पाहू शकतो हे आपल्याला माहीत आहेच. या अल्ट टॅबची जागा घेणारे 'अल्ट टॅब रिप्लेसमेंट' हे टूल डाऊनलोड करता येईल. यात जादा फायदा असा की जो प्रोग्राम तुम्हाला ओपन करायचा आहे त्याचे चित्रही दिसेल. म्हणजे एकाच प्रोग्राममधल्या अनेक विंडोज ओपन असतील तर नेमकी कोणती विंडो ओपन करायची हे लक्षात येईल. 'इमेज रिसायझर' हे टूल तुम्हाला मेलवरून मोठा फोटो पाठवायचा असेल तर उपयोगी पडते. नावाप्रमाणेच फोटोचा साइझ कमी-जास्त करण्यासाठी या टूलचा वापर होतो. मेलवरून बऱ्याचवेळा मोठे फोटो जात नाहीत, मग त्याचा साइझ कमी करून पाठवावा लागतो. ते काम हे टूल करते.

तुम्हाला कम्प्युटरमध्ये सीडी घालून त्यातील फोटो क्रमवारीने बघायचे असतील तर? मग 'सीडी स्लाइड शो जनरेटर' डाऊनलोड करा. सीडीतल्या फोटोंचा स्लाइडशो पाहता येईल. याशिवायही काही पॉवरटॉइज उपलब्ध आहेत. विंडोज एक्सपी सिस्टिम अधिक वेगाने व अधिक सुलभतेने चालायची असेल तर हे टॉइज आवश्यक आहेत. यातील सुविधा कम्प्युटरमध्ये आधी उपलब्ध नव्हत्या का? आहेत, पण सर्वसामान्य माणसाला त्या शोधून वापरणे कठीण असते. म्हणून पॉवरटॉइजचे महत्त्व वाढते.

वायफाय हॅकिंग

वाय-फाय म्हणजे काय?

कम्प्युटरसाठी वापरल्या जाणाऱ्या वायरलेस नेटवर्क कनेक्टिव्हीटीला वाय-फाय म्हणतात. वायरच्या वापर टाळून कम्प्युटर नेटवर्क करण्यासाठी वाय-फाय सिस्टमचा वापर केला जातो. सीडीएमए, जीएसएम, ब्लू टूथ प्रमाणेच ८०२.११ हे एक वायरलेस प्रोटोकॉल सिस्टम आहे त्यालाच वाय-फाय म्हटले जातेे. ही सर्वात सोप्पी आणि स्वस्त कम्युनिकेशन सिस्टम असल्यामुळे याचा वापर जगभर मोठ्या प्रमाणात होतो. कम्प्युटर नेटवकीर्ंगसाठी सर्वच ठिकाणी वायरचा वापर करणे शक्य होत नाही अशा ठिकाणी कम्प्युटर, लॅपटॉप अथवा मोबाइल वाय-फाय राऊटर बसवून त्याद्वारे एका कम्प्युटरशी दुसऱ्या कम्प्युटरचे नेटवकिर्ंग शक्य होते. पण ज्या कम्प्युटरला अशी कनेक्टिव्हीटी आहे तेथेच या सेवेचा वापर करता येऊ शकतो.

वाय-फायचे फायदे

कम्युनिकेशन, डेटा शेअरिंग यासाठी वाय फायचा मोठ्या प्रमणात वापर केला जातो. शिवाय हे तंत्रज्ञान वायरलेस आहे हाच त्याचा सर्वात मोठा फायदा आहे. युरोप आणि अमेरिकेत छोट्या गावांमध्येही या सिस्टमचा संवादासाठी मोठ्या प्रमाणात वापर सुरू आहे. एका वाय फाय सिस्टमद्वारे ५० मीटरपासून ते अगदी १२० किमी अंतरापर्यंतचे नेटवकिर्ंग करता येऊ शकते. इंटरनेट जागृतीमध्ये वाय-फायचा मोठा उपयोग होऊ शकतो असे इंटरनेट तज्ज्ञांचे म्हणणे आहे. नैसगिर्क आपत्तींमध्ये वायरने केल्या जाणाऱ्या नेटवर्कला धोका उद्भवतो. पण वाय-फाय नेटवकिर्ंग हे पूर्णत: वायरलेस असल्यामुळे अशा आपत्तींच्यावेळी उलट या सिस्टमचा मदतकार्य किंवा संवादासाठी मोठ्या प्रमाणात उपयोग होऊ शकतो. पण त्यासाठी अनेकांकडे वाय-फाय कनेक्टिव्ही असायला हवी.

वाय-फायचे तोटे

इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगने नेटवकिर्र्ंगसाठी काही नियम बनवले आहेत. वाय-फायची सोय उपलब्ध करुन देणाऱ्यांनी ते नियम पाळणे आवश्यक असते. असे असले तरी वाय-फायची सुरक्षा भेदणे शक्य आहे. कारण हे तंत्रज्ञान वायरलेस आहे त्यामुळे वायफाय नेटवर्क हॅकर्सना डिटेक्ट करणे सोपे जाते. याचाच गोष्टीचा फायदा घेऊन अतिरेक्यांकडून वाय-फाय हॅकिंग केल्याचे प्रकार समोर आले होते.

वाय-फाय हॅकिंगपासून कसे सावध कसे राहाल?

* नेटवकिर्ंगमधील एसएफआयडी (सव्हीर्स फेट आयडेण्टीफाय) ब्रॉडकास्ट थांबवणे हा एक चांगला पर्याय आहे. यामुळे एखाद्या हॅकरला वाय-फायचा प्रेझेन्स डिटेक्ट करणे कठीण जाईल.

* प्रत्येक नेटवकिर्ंगला एक आयडी दिलेला असतो त्याला मॅक (मिडिया अॅक्सेस कंट्रोल) अॅड्रेस म्हणतो ती सेटिंग अॅक्टिव्ह केल्यास हॅकर्सना नेटवकिर्ंगमध्ये प्रवेश करणे कठीण होते.

* डब्ल्यूईपी (वायर इक्व्हीव्हॅलण्ट प्रायव्हसी) हे सेटिंग सुरू केल्यास नेटवकिर्ंगमध्ये असलेल्या व्यक्ती व्यतिरिक्त तिसऱ्या कोणालाही या नेटवकिर्ंगमध्ये प्रवेश करणे कठीण होते.

* नेटवकिर्ंगला अवघड पासवर्ड ठेवणे अथवा पासवर्ड ठराविक काळानंतर बदलत राहाणे हा देखील एक चांगला पर्याय आहे अशी माहिती इंटरनेट तज्ज्ञ महेश फाटक यांनी दिली.

तुमच्या पर्सनॅलिटीचा आरसा

रेझ्युमे आणि सीव्ही... यात नेमका फरक काय? याचं उत्तर कित्येकांना ठाऊक नसतं. साहजिकच नोकरीच्या अॅप्लिकेशनसाठी रेझ्युमेचा टाइप कोणता असावा, -मेल आयडी कसा द्यावा, याचेही काही फण्डे असतील, हे कुणाच्या ध्यानातच येत नाही. रेझ्युमे हा तुमच्या पर्सनॅलिटीचा आरसा...तो कसा चकचकीत असावा, याचं हे इंगित

जमाना खरोखरच बदललाय. काही वर्षांपूर्वी कुणी नोकरीसाठी केलेला अॅप्लिकेशन किंवा रेझ्युमे तुमच्याकडे असेल तर, त्याकडे एक नजर टाका. काय जाणवतं? या अर्जावर या व्यक्तीला नोकरी मिळालीच कशी, असा प्रश्न उभा राहील. आता एखाद्या नवख्या 'अर्जदारा'च्या रेझ्युमेवर नजर टाका. तुम्हाला पहिल्या वाक्यापासून अनेक चुका किंवा त्रुटी आढळतील.

आता एक करा. तुम्ही अनुभवाने चांगला रेझ्युमे ड्राफ्ट करताय, असा तुमचा समज असेल तर, तुम्ही तयार केलेला रेझ्युमे रिक्रूटमेंट क्षेत्राशी संबंधित अनुभवी व्यक्तीला दाखवा. तुमचा समज खोटा ठरेल, इतक्या चुका आणि त्रुटी त्यात निघतील...

तात्पर्य: बदलत्या जगाचं प्रतिनिधित्व करणारी जनरेशन नेक्स्ट किंवा जगातील घडामोडींचे साक्षीदारही अजून सफाईदार आणि अचूक रेझ्युमे ड्राफ्ट करू शकत नाहीत.

' Resume ' किंवा ' Curriculum vitae ' (सीव्ही) यामध्ये विभाजनाची पुसटशी रेषा आहे, हे किती जणांना ठाऊक आहे? कोऱ्या कागदांवर काही जणांचा रेझ्युमे लिहिण्याचा आग्रह असतो तर, काही जणांना सीव्ही लिहिणं अधिक भावतं. पण त्यांचा अलिखित नियम समजावून घेतल्यास पहिल्याच पायरीवर ठेचकाळण्याची शक्यता अधिक असते. तुमचं शिक्षण, अनुभव, अवगत तंत्र आणि यशाची किमान शब्दांत मांडणी म्हणजे रेझ्युमे. रेझ्युमे दोन पानांहून अधिक विस्तृत असू नये, असा संकेत आहे. भरगच्च आणि लांबलचक रेझ्युमे लिहिण्याचा प्रयत्न नेहमी एम्प्लॉयरसाठी रटाळ किंवा दुर्लक्षित राहू शकतो. कंपनीच्या जॉबसाठी तुमच्याकडे शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि आवश्यक तंत्र आहे काय, इतकंच तुमच्या रेझ्युमेमधून दिसायला हवे. सीव्ही म्हणजे तुमच्या पात्रतेची विस्तृत व्याख्या. खरं तर, तुमच्याच कंपनीमध्ये दुस - या पदासाठी तुम्ही जेव्हा अर्ज करता, तेव्हा कार्यालयीन अनुभवाची माहिती देण्यासाठी सीव्ही लिहिला जातो.

रेझ्युमे किंवा सीव्ही टाईप करण्यासाठी तयारी आवश्यक आहे. प्रथम एका साध्या कागदावर स्वत:ला जोखा. तुमची कार्यक्षमता दर्शवणारे मुद्दे लिहून काढा. इतरांपेक्षा तुम्ही वेगळे कसे आहात, हे तुमच्या रेझ्युमेवर दिसायला हवं. जो अनुभव किंवा शैक्षणिक पात्रता अर्ज करणाऱ्या प्रत्येक उमेदवाराकडे असेल ते मुद्दे विस्तृतपणे लिहिणं टाळा. विशेष म्हणजे रेझ्युमेमध्ये अनेक छोट्या चुका राहतात. रेझ्युमे म्हणजे तुमच्या पर्सनॅलिटीचा आणि तुमच्या एफिशियन्सीचा आरसाच. त्यामुळे या चुकांचा डाग त्या आरशावर नको. रेझ्युमे उठावदार आणि बिनचूक होण्यासाठीच काही अतिशय सामान्य पण तितकेच लक्षणीय नियम नेहमी लक्षात ठेवा.

- कागद स्वच्छ आणि पांढराच असावा. एकाच बाजूला मजकूर टाइप करावा.

- १२ ते १४ पॉइण्टमध्ये मजकूर टाइप करा. साधा-सरळ टाइप वापरावा. डेकोरेटिव्ह टाइप टाळा. मजकुराचा संपूर्ण टाइप एकच ठेवा.

- टाइप इटालिक, अंडरलाइन करण्याचा अट्टाहास टाळा. पानावर उभ्या-आडव्या रेषा आखू नका. बुलेटही अत्यावश्यक ठिकाणीच वापरा.

... या सूचना खरं तर साध्या पण तरीही काटेकोरपणे लक्षात ठेवायलाच हव्या. कारण त्यावरूनच तुमच्या परफेक्शनची खात्री पटते. स्पेलिंग, पंक्चुएशन आणि व्याकरण तपासून पाहा. खात्री नसेल तर डिक्शनरीची मदत घ्या. याबरोबरच आणखी काही मुद्दे लक्षात ठेवा.

- नेहमी पूर्ण नाव लिहा. टोपण नाव हे केवळ घरात किंवा मित्रांमध्ये वापरलं जातं, हे ध्यानात ठेवा.

- कायमस्वरुपी पत्ता, टेलिफोन, मेल आयडी आणि पिन कोड लिहिण्यास विसरू नका.

- तुमचा मेल प्रोफेशनल असावा आणि नसेल तर, जॉब सर्चसाठी तसा मेल आयडी तयार करा.

जर घरच्या टेलिफोनला किंवा मोबाइलला आन्सरिंग मशीन असेल तर, त्यावरील रेकॉर्ड केलेलं संभाषण सभ्य असू द्या.

- नोकरीचा अनुभव नेहमी उलट्या क्रमाने लिहावा. म्हणजेच सर्वात ताजा अनुभव प्रथम लिहा.

- शिक्षणाविषयी लिहितानाही हाच क्रम कसोशीने पाळा.

- जी शॉर्ट फॉर्म प्रसिद्ध किंवा सर्वमान्य नसतील ती टाळा. उदा. बीपीएल, एलजी यांसारखी लघुरुपं समजता येणारी आहेत. पण दिल्ली पब्लिक स्कूलला डीपीएस असा शॉर्ट फॉर्म करू नका.

- कामाचा विस्तृत अनुभव मांडा. ज्या जॉबसाठी तुम्ही अर्ज करत आहात त्याच्याशी संबंधित नसलेला पूवीर्च्या कामाचा अनुभवही लिहा.

- तुमचं शिक्षण अथवा अनुभव जसा वाढत जाईल तसा तुमचा रेझ्युमे अपडेट करायला विसरू नका.

- रेझ्युमेमध्ये कंपनीनुसार बदल व्हायला हवा. नवं पद, नव्या कंपनीनुसार परफेक्ट रेझ्युमे लिहिणं, हे आव्हान तुम्हाला स्वीकारावंच लागेल.

... आणि रेझ्युमेबाहेरील पण तरीही आवश्यक नियम म्हणजे 'बी पॉझिटिव्ह'. तुमच्या रेझ्युमेमधूनही तुम्ही या पदासाठी सर्वात योग्य आहात, हे दिसायलाच हवं.

अब लॉक किया जाय...

करिअरची वाटचाल आता कम्प्युटरशिवाय शक्य नाही. तुमचा सीव्ही, तुमचं प्रोग्रेस कार्ड, तुमचे पर्सनल डिटेल्स सगळं काही कम्प्युटरमध्ये साठवता येतं. पेनड्राइव्ह सारख्या खिशातल्या डिव्हाइसने ते कुठेही नेता येतं. पण या सगळ्याचा योग्य वापर करता यायला हवा. ते योग्य ठिकाणी सेव्ह करायला हवं आणि हवं तेव्हा सापडायलाही हवं. हे सगळं टेक्निक जमलं, तर कम्प्युटरजीच्या मदतीने तुम्ही एखादी उत्तम संधी खास स्वत:साठीच लॉक करू शकता. त्याच्याच काही टिप्स...

दहावी पास होतानाच 'पुढे काय' हा प्रश्न आपण सोडवलेला असतो. आपल्या शैक्षणिक करिअरविषयी आणि पात्रतेविषयी आपल्याला पुरेशी कल्पना आलेली असते. बारावीनंतर तर करिअरला प्रत्यक्ष सुरूवात होते. या वाटचालीत कम्प्युटरचा योग्य वापर केलात, तर तुम्ही अधिक कार्यक्षमतेने काम करू शकता. तुम्ही जो विषय घेतलाय, त्याबद्दल इंटरनेटवरून माहिती मिळवणं आणि सतत नवनव्या घडामोडींबद्दल जागरूक राहणं हा एक मार्ग झालाच, पण रोजच्या रोज ते शक्य नसल्यास आठवड्याच्या अभ्यासाची नोंद कम्प्युटरमध्ये ठेवून आपण योग्य दिशेने जात आहोत की नाही हेही पाहू शकता.

यासाठी किमान आवश्यकता लागेल ती कम्प्युटरमध्ये विषयवार फोल्डर तयार करण्याची. ते फोल्डर तीन प्रकारचे असू शकतील. प्रत्येक विषयाचा अभ्यासक्रम काय आहे, आपण तो किती पूर्ण केलाय आणि किती बाकी आहे हे सांगणारा एक फोल्डरसमूह असेल. अभ्यासाचा कोणता भाग अधिक महत्त्वाचा आहे, कोणत्या भागावर परीक्षेत अधिक प्रश्न विचारले जातात, या सगळ्याची नोंद त्यात तुम्ही ठेवू शकता.

दुस-या समूहात प्रत्येक विषयात आपल्याला किती मार्क मिळताहेत त्याची नोंद करा. म्हणजे आपला कोणता विषय पक्का आहे आणि कोणत्या विषयात आपण मागे पडतो आहोत ते कळेल. त्याप्रमाणे सुधारणा करता येतील. स्पर्धेच्या जगात एका मार्कालाही खूपच महत्त्व असल्याने ही काटेकोर नोंद ठेवणं तुमच्या पथ्यावरच पडेल.

तिस-या प्रकारचा फोल्डर तुमचं शैक्षणिक ज्ञान विस्तारण्यासाठी मदत करेल. अभ्यासाच्या विषयाशी निगडित जगात काय ताज्या घडामोडी घडताहेत ते या फोल्डरमध्ये सेव्ह करून ठेवता येईल. जनरल नॉलेज वाढवण्याबरोबरच पर्सनॅलिटी डेव्हलपमेण्टही त्यातून साधता येईल.

हे सारे फोल्डर कम्प्युटरच्या 'सी' ड्राइव्हमध्ये नसावेत. पुढेमागे कोणत्याही कारणाने कम्प्युटर क्रॅश झालाच तर 'सी' ड्राइव्हमधल्या सगळ्या फाइल्स नाहीशा होण्याचा संभव असतो. म्हणून हे फोल्डर 'डी' अथवा 'इ' (तुम्ही जी काही नावं द्याल त्या) ड्राइव्हमध्ये सेव्ह करावेत. कम्प्युटर क्रॅश झाल्यावर हे ड्राइव्हही खराब होतात. पण निदान रिकव्हरीची काही शक्यता तरी असते. तुमच्या मशीनमधील यंत्रणा 'फॅट' पद्धतीची असेल तर डाटा रिकव्हर करणं सोपं जाईल. पण 'एनटीएफएस' पद्धतीची असेल (त्याचे काही फायदे असले तरी) तर जुना डाटा मिळवणं कठीण जातं.

आपल्या विषयातले ताजे ट्रेंड्स तुम्ही मेलवर मागवू शकता. त्यासाठी गूगल अथवा एखादं वृत्तपत्र वा मासिकाची मदत घ्या. गुगलमध्ये अॅलर्ट नावाची सोय आहे. त्यात हव्या असणाऱ्या विषयाचा क्ल्यू दिला की रोजच्या रोज जगभरात घडणाऱ्या त्या विषयाच्या घडामोडी तुमच्या इमेलबॉक्समध्ये येऊन पडतील. गूगलमेलअंतर्गतच तुम्ही वेगळे फोल्डर करू शकता, मग ते मेल थेट त्या फोल्डरमध्ये जाऊन पडतील. उदा. फिजिक्सबाबतच्या बातम्या फिजिक्स फोल्डरला, इंजिनिअरिंग अथवा मेडिकल किंवा कोणत्याही विशिष्ट शाखेच्या घडामोडी त्या-त्या विषयाच्या फोल्डरमध्ये जातील. तुम्हाला रोजच्या रोज मेल ओपन करायला वेळ नसला तरी कधीतरी सवडीनुसार सारे फोल्डर पाहू शकता. अभ्यासाच्या व्यापामुळे रोज संबंधित विषयांच्या अगणित साइट्स ओपन करायला वेळ मिळणं कठीणच असतं. अशावेळी हे अॅलर्ट उपयोगी पडू शकतात. बरीच वृत्तपत्रं आणि मासिकं यांनी न्यूजलेटर्सची सोय केली आहे. अभ्यासाच्या विषयानुसार ही न्यूजलेटर्स फुकटात मेलवर मागवू शकता.

सायन्स वा मॅथ्ससाठी आकृत्यांची गरज असते. त्या पुरवणारं सॉफ्टवेअर कम्प्युटरमध्ये बसवलं, तर अभ्यास अधिक सोपा होईल. मायक्रोसॉफ्ट वर्ड आणि ऑफिस सूटपेक्षा ओपन ऑफिस सॉफ्टवेअरमध्ये अधिक सोयी आहेत. त्यावर काही किमान काम तुम्ही करू शकता. हे सॉफ्टवेअर नेटवरून फुकटात डाऊनलोड करता येतं. (साइटचं नाव : ओपनऑफिस डॉट ऑर्ग). टाइम्स वृत्तसमूहासह काही कंपन्यांनी दहावीपर्यंतच्या अभ्यासाच्या व्हीसीडी काढल्या आहेत. नंतरच्या अभ्यासक्रमावर ही सोय अजून उपलब्ध नाही. पण अभ्यासाच्या विषयाशी निगडित व्हीसीडी मिळत असल्या तर त्या घ्यायला काहीच हरकत नाही. वेगळा 'लाइव्ह' अभ्यास त्यावरून करता येईल.

हे सारं झालं अभ्यासाविषयी. पण तुम्ही श्रम घेऊन जो डाटा कम्प्युटरवर सेव्ह कराल त्याचा बॅकअप घ्यायला विसरू नका. हल्ली वेगळ्या हार्ड डिस्क विकत मिळतात. त्यावर हा डाटा घेऊ शकता. वेगळी डिस्क घ्यायची नसेल तर स्वत:च्या इमेलवर सेव्ह करू शकता. अथवा वेगळे बॅकअप सॉफ्टवेअर डाऊनलोड करून घेउ शकता. त्याची एक सीडीही बनवून ठेवा. म्हणजे मेलवर पाठविण्याचा फायदा असा की जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तरी हा डाटा तुम्ही अॅक्सेस करू शकाल.

अभ्यासानंतर मुद्दा येतो तो नोकरीचा. शिक्षण संपण्याची वेळ आली की नोकरीसाठी अर्ज करण्याची वेळ येते. त्यासाठी आपला सीव्ही किंवा रेझ्युमे तयार हवा. हा लिहिण्याच्या पद्धतीत बदल झालाय. नेटवरच यातले नवनवीन प्रकाराचे नमुने मिळू शकतील. आपण इतर उमेदवारांपेक्षा वेगळे कसे आहोत हे त्यात नीट स्पष्ट करावं लागेल.

हल्ली बऱ्याच कंपन्या इंटरनेटवरील साइटवर अर्ज मागवतात. त्यामुळे अर्जाची बॅकग्राउंड आकर्षक असेल हे पाहिलं पाहिजे. त्याची टेम्पलेट्स वर्ड वा ओपन ऑफिसमध्ये उपलब्ध आहेत. आकर्षक डिझाइन, डोळ्याला त्रास न होता वाचता येणाऱ्या फाँटमधला मजकूर, जिथे अर्ज करायचाय, त्या कंपनीबद्दलची थोडी माहिती आणि शेवटी आपणच कसे त्या पदाला कसे योग्य आहोत याचा आग्रह धरणारा मजकूर लिहावा लागेल. याचे फॉरमॅट्सही नेटवर मिळतात.

सोबत आपली शैक्षणिक सर्टिफिकेट्स जोडावी लागतील. ती आधीच स्कॅन करून ठेवा. नेटवर अर्ज पाठवताना तिच्या अॅटॅचमेंट्स आवश्यक आहेत. बारावीची मार्कशीट, नंतरच्या अभ्यासक्रमाची मार्कशीट, अभ्यासाव्यतिरिक्त एखाद्या विषयात (खेळात वा कलेत) प्राविण्य मिळवलं असेल तर त्याची सर्टिफिकेट्स स्कॅन करून जोडावीत. प्रत्यक्ष मुलाखतीला गेल्यावर सर्टिफिकेट्स दाखवावी लागतीलच, पण नेटवर पाठवून ठेवली की तुमच्याविषयीची सारी माहिती कंपनीला लगेच मिळेल.

जी गोष्ट सर्टिफिकेट्सची, तीच स्वत:च्या फोटोची. साधारणपणे पासपोर्ट साइझचे फोटो वापरले जातात. ते अधिकाधिक आकर्षक असावेत यासाठी प्रयत्न केला पाहिजे. तेही स्कॅन करून अर्जाबरोबर पाठवावेत. हे सारं स्वत:च्या इमेलवरही साठवून ठेवावं. म्हणजे बाहेरगावी गेल्यावर तिथे अर्ज करायची वेळ आली तर ते तुम्ही सहज पाठवू शकाल. त्याचं प्रिंटआउट लागलं तरी सहज घेऊ शकाल. मात्र हे प्रिंटआउट आधीपासून काढून ठेवू नका. बराच काळ फाइलमध्ये ठेवून मग कागद पिवळा पडतो. अशा कागदावर दिलेला अर्ज पहिल्याच फटक्यात फेटाळला जाईल.

आजच्या तंत्रज्ञानामुळे तुम्ही एक पाऊल पुढे जाऊ शकता. तीन किंवा चार मिनिटांचं एक व्हिडिओ प्रेझेंटेशन तयार करा, त्यात स्वत:विषयी माहिती द्या. ती व्हिडिओ अॅटॅचमेंट अर्जाबरोबर पाठवा. अर्ज पाहणारा माणूस तुम्हाला 'लाइव्ह' पाहू शकेल. डिजिटल कॅमेरे इतके स्वस्त झालेत की स्वत:चं तीनचार मिनिटांचं शूटिंग तुम्ही सहज करू शकाल. कॅमेरा नसला तर मित्राची मदत घेऊ शकता. ते शूटिंग झालं की कम्प्युटरवर डाऊनलोड करा. आपण कसे बोललो, कसे उभे राहिलो, स्वत:ला एकूणच कसं प्रेझेंट केलं ते पाहा. काही सुधारणा हवी असेल तर पुन्हा शूटिंग करा. साधारणत: चारचार महिन्यांनी नव्याने शूटिंग करा. कारण तोपर्यंत परिस्थिती (कंपनी प्रोफाइल, राजकीय वा सामाजिक स्थिती) बदललेली असू शकते. त्याचा ताजा रेफरन्स प्रेझेंटेशनमध्ये असला, तर अधिक परिणाम होतो.

थोडक्यात, कम्प्युटर हा तुमचा अभ्यासातला खराखुरा मार्गदर्शक बनू शकतो.

एका क्लिकसरशी... ई-लर्निंग

जगप्रसिध्द मॅनेजमेण्ट गुरूंकडून मॅनेजमेण्टचे फण्डे घरबसल्या शिकणं शक्य आहे का? आपल्याला एखाद्या शब्दाचं स्पेलिंग आठवेनासं झालं, तर कपाटातली डिक्शनरी काढता कुणी मदतीला येईल का? तुम्ही व्हर्चुअल क्लासरुमचे विद्यार्थी झालात, तर या सगळ्या गोष्टी एका क्लीकसरशी साध्य होतात. आता कम्प्युटर घरोघरी आलेत आणि इंटरनेटही. त्यामुळेच -लर्निंगचा फायदाही तुम्ही जाणून घ्यायलाच हवा.

वाचता वाचता एखादा इंग्रजी शब्द खड्यासारखा टोचला तर काय कराल? फारतर तो शब्द (खडा) गिळाल किंवा त्याचा अर्थ धुंडाळण्यासाठी डिक्शनरी शोधाल. डिक्शनरी नाहीच मिळाली तर काय? सरळ तुमचा पीसी ऑन करा... आणि त्याच्याशी शेपूट जोडून बसलेल्या माऊसचा ताबा घ्या... इंटनेटवर गुगलवर 'टोचलेल्या' शब्दाच्या अर्थासह तो वाक्यात योग्य पद्धतीने कसा वापरायचा याच्या व्याकरणासह टीप्स देणाऱ्या हजारो साईट्स तुमच्या स्क्रीनवर वाहू लागतील... केवळ डिक्शनरीच नव्हे तर तुमच्या आवडीच्या एक्सपर्ट प्रोफेसर्सची लाईव्ह लेक्चर्स पाहण्याची, त्यातून शिकण्याची ताकद त्या इवल्याश्या माऊसने कमावली आहे. ही ताकद सामावली आहे ती '-लर्निंग' या छोट्याश्या शब्दांत!

-लर्निंग (इलेक्ट्रॉनिक लर्निंग) म्हणजे कम्प्युटर आणि त्यावर अवलंबून असलेल्या व्हिडिओ स्क्रीन कॅप्चर, एमपी थ्री प्लेअर, वेबसाईट्स अशा अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या साह्याने शिक्षण घेणं! डिस्टन्स लर्निंग, व्हर्चुअल क्लासेस हा -लनिर्ंगचाच एक भाग! -लर्निंगची आंतराष्ट्रीय बाजारपेठ २००८मध्ये २१ बिलियन डॉलरची असेल असा अंदाज वर्तवण्यात येतोय.

इंजिनीअरिंग, मेडिकल, लॉ या क्षेत्रात भासणाऱ्या दर्जेदार शिक्षकांच्या कमतरतेवरही -लर्निंग हा चांगला पर्याय ठरू शकतो, असं महाराष्ट्र नॉलेज कॉपोर्रेशनचे कार्यकारी संचालक विवेक सावंत यांना वाटतं. आयआयटीसारख्या शिक्षणसंस्थाही या प्रश्नापासून दूर नाहीत. एका शिक्षणसंस्थेतील तज्ज्ञ शिक्षकांच्या ज्ञानाचा फायदा इतर संस्थांतील विद्यार्थ्यांनाही व्हावा, या दृष्टीने 'व्हर्चुअल क्लासेस' ही संकल्पना आता कुठं रुजू लागली आहे..

आयआयटीसारख्या शिक्षणसंस्थांनी या क्षेत्रात चांगलीच आघाडी घेतली आहे. एज्युसॅटच्या माध्यमातून आयआयटीतील शिक्षकांची व्हिडिओ चित्रिकरण केलेली लेक्चर्स पाहण्याची संधी इतर कॉलेजातील विद्यार्थ्यांना मिळते. मुंबईसह सातही आयआयटीजमध्ये त्यासाठी अत्याधुनिक स्टुडिओ उभारण्यात आले आहेत. महाराष्ट्रात केवळ कॉलेज ऑफ इंजिनीरिंग पुणे इथेच आयआयटीच्या शिक्षकांचं लाईव्ह स्क्रीनिंग पाहता येतं. याच प्रकारची सुविधा 'मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी' (एमआयटी) या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणसंस्थेने उपलब्ध करून दिली आहे. एमआयटीच्याच वेबसाईटवर देशभरातील आयआयटीसारख्या दजेर्दार शिक्षणसंस्थांच्या ऑनलाइन लेक्चर्सच्या लिंकेजेसही उपलब्ध आहेत.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंटतर्फे (आयसीएआय) डिजिटल फॉरमॅट आणि र्व्हच्युअल क्लासेसच्या माध्यमातून -लर्निंगची संकल्पना राबवण्यात येत आहे. तर कॉन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीने (सीआयआय) एक पाऊल पुढे टाकत विद्यार्थ्यांकरिता eshikshaindia.in पोर्टल सुरू केलंय. १२ ते १७ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमातील कठीण प्रश्नांची उत्तरं मल्टिमीडिया, व्हॉईस ओव्हर, अॅनिमेशन आणि आलेखांच्या साहाय्याने सोडवण्यास हे पोर्टल मदत करतं. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, इंग्लिश, भूगोल या विषयाशी संबंधित शंकांचं समाधान करण्याकरिता या पोर्टलची निर्मिती करण्यात आली आहे.

बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्ड सायन्सेसमध्ये (बिट्स पिलानी) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विद्यार्थ्यांच्या शंका दूर केल्या जातात. विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यासक्रमाशी संबंधित पुस्तकं उपलब्ध करून देऊन बिट्स पिलानीनं मोठीच आघाडी घेतली आहे. केवळ विद्याथीर्च नव्हे तर विप्रोसारख्या कंपन्याही नामवंत शिक्षणसंस्थांशी टायअप करून -लर्निंगच्या माध्यमातून आपल्या स्टाफच्या कण्टिन्युइंग एज्युकेशनसाठी प्रयत्न करत आहेत.

अजून तरी भारताचा -लर्निंगमधील सहभाग फारच नगण्य आहे. इतर देशांच्या तुलनेत भारतातील शिक्षणसंस्था -लनिर्ंगच्या क्षेत्रात अजूनही बाल्यावस्थेतच आहे. विद्यार्थ्यांना आथिर्क मोबदल्यात ऑनलाईन स्टडी मटेरियल उपलब्ध करून देणा-या खासगी कंपन्या तशा प्रचंड आहेत. पण, यात शिक्षणसंस्थांचा सहभाग अत्यंत मर्यादित म्हणता येईल.

मॅकॅन्सी-नॅसकॉमच्या अहवालानुसार भारतात उच्च शिक्षण घेणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांपैकी २३ टक्के विद्यार्थी डिस्टन्स एज्युकेशन घेत आहेत. परंतु आताच्या घडीला काही ठराविकच शिक्षणसंस्था कम्प्युटर किंवा इंटरनेटचा डिस्टन्स लनिर्ंगसाठी वापर करताहेत. डिस्टन्स एज्युकेशन घेणा-या विद्यार्थ्यांची संख्या २०१० पर्यंत ४० टक्क्यांवर नेण्याची केंद सरकारची योजना आहे. डिस्टन्सला प्रवेश घेणारे विद्यार्थी हे बहुतांशी नोकरी करता करता शिक्षण घेणारे असतात. म्हणूनच, कमी पैशात घरच्या घरी कम्प्युटरवर शिक्षण घेऊ इच्छिणा-या विद्यार्थ्यांच्या सोयीकरिता शिक्षणसंस्थांनी या क्षेत्रातील आपला सहभाग वाढवण्याची गरज आहे. लवकरच हे चित्र पालटेल अशी अपेक्षा व्यक्त होतेय. dmoz.org/reference/education/distance-learning, dmoz.org/reference/education/instructional-techonology

या वेबसाईटवर डिस्टन्ट लर्निंग घेऊ इच्छिणा - या विद्यार्थ्यांकरिता माहितीचा खजिनाच आढळतो. ज्या विद्यार्थ्यांना -लर्निंगद्वारे शिकण्याची वा आपल्या माहिती-ज्ञानाचा विस्तार करायची इच्छा आहे, त्यांच्याकरिता काही उपयुक्त वेब-साईट्स...

) e-learningcenter.com

) virtualstudies.net

- लर्निंगचे फायदे

)ऑनलाईन डिक्शनरी, इंग्रजी व्याकरण या विषयी इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या सुविधा कमी वेळेत वापरणं शक्य होत असल्याने संपर्काची भाषा सुधारते.

)सादरीकरणाच्या पारंपरिक 'ब्लॅक अॅण्ड व्हाईट' (फळा आणि खडू) साधनांऐवजी अत्याधुनिक तंत्रं वापरता येतात. उदा. पॉवरपाईंट प्रेझेन्टेशन, ग्राफिक्स, डिझाईन्स, ऑडिओ-व्हिडिओचा वापर यामुळे विषय समजणं सोपं होतं.

)इलेक्ट्रॉनिक साधनांच्या वापरामुळे वेळ वाचतो. एका क्लिकच्या झटक्यात माहितीचा खजिना उलगडतो.

)जगातील कुठल्याही भागातून शिक्षक वा तज्ज्ञांकडून ज्ञानाची देवाण-घेवाण करता येते.

)केवळ विद्याथीर्च नव्हे तर मेडिकल, इंजिनीअरिंग आदी क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यावसायिकांनाही -लनिर्ंगद्वारे निरंतर शिक्षण (कण्टिन्युइंग एज्युकेशन) घेऊन आपल्या ज्ञानाचं अपडेटिंग करता येणं शक्य आहे.