kd Mumbai

हा 'माऊस' कुठून आला?

डग्लस एंगेलबर्ट नावाच्या कॅलिफोनिर्यातल्या 'स्टॅनफर्ड रिसर्च इन्स्टिट्यूट'मध्ये काम करणाऱ्या संशोधकाने पहिला माऊस तयार केला. १९२५ साली जन्मलेल्या एंगेलबर्टचं बालपण ओरेगॉनमधल्या पोर्टलॅंडमधल्या एका शेतावर गेलं. त्याच्या वडिलांचं रेडिओचं दुकान होतं. त्यामुळे लहानपणापासूनच एंगेलबर्टला इलेक्ट्रॉनिक्सची गोडी लागली. कम्प्युटरवर काम करत असताना अचूकपणे त्याच्या पडद्यावर कोणत्याही ठिकाणी हवं ते टाइप करता यावं म्हणून माऊसची कल्पना एंगेलबर्टने काढली.

देवभक्त आणि विज्ञाननिष्ठ ही दोन्हीही मंडळी उंदराला सारखंच घाबरतात. गणपती अाणि कम्प्युटर या दोन्ही 'ज्ञानीं'चं या माऊसशिवाय चालत नाही, म्हणूनच हे असावं! कम्प्युटरचंही जणू वाहन बनलेल्या माऊसची ही कहाणी. बऱ्याच जणांची अशी समजूत आहे की, माऊसचा जन्म अॅपल कंपनीच्या 'मॅकिन्टॉश' या ऑपरेटिंग सिस्टिमबरोबर १९८४ साली झाला असावा. पण खरं म्हणजे त्यापूवीर् दोन दशकं माऊसचा कम्प्युटरच्या जगतात संचार होता. डग्लस एंगेलबर्ट नावाच्या कॅलिफोनिर्यातल्या 'स्टॅनफर्ड रिसर्च इन्स्टिट्यूट'मध्ये काम करणाऱ्या संशोधकाने पहिला माऊस तयार केला. १९२५ साली जन्मलेल्या एंगेलबर्टचं बालपण ओरेगॉनमधल्या पोर्टलॅंडमधल्या एका शेतावर गेलं. त्याच्या वडिलांचं रेडियोचं दुकान होतं. त्यामुळे लहानपणापासूनच एंगेलबर्टला इलेक्ट्रॉनिक्सची गोडी लागली. कम्प्युटरवर काम करत असताना अचूकपणे त्याच्या पडद्यावर कोणत्याही ठिकाणी हवं ते टाइप करता यावं म्हणून माऊसची कल्पना एंगेलबर्टने काढली. माऊस हाताने हलवून त्याच प्रमाणात कम्प्युटरच्या पडद्यावरची माहिती आपल्याला हव्या त्या ओळीत आणि उभ्या 'कॉलम'मध्ये लिहिणं/बदलणं माऊसमुळेच जमतं. एंगेलबर्टच्या कोणा सहकाऱ्याला 'माऊस' हे नाव त्या यंत्राच्या आकारावरून सुचलं. एंगेलबर्ट त्याला त्यापूवीर् 'एक्स वाय पोझिशन इंडिकेटर' असं म्हणे.

खरं म्हणजे माऊसचा शोध दुसऱ्याच एका व्यापक पातळीवरच्या कल्पनेतून लागला. त्याकाळात कम्प्युटर यशस्वीपणे हाताळून दाखवणं हे एक आव्हानच असे! कारण कम्प्युटरबरोबरची 'बातचीत' आजच्यासारखी कीबोर्ड, माऊस, टचपॅड यासारख्या सोप्या उपकरणांच्या मदतीने व्हायचा काळ उजाडायचा होता. मोठमोठ्या भेंडोळ्या असणाऱ्या मॅग्नेटिक टेप्स, कार्ड-रीडर्स आणि पंचकार्डस् वापरून भोकं पाडलेल्या कागदांवरची सांकेतिक माहिती अशा चित्रविचित्र मार्गांनी माणसाचा सामना कम्प्युटरशी व्हायचा. या युध्दाऐवजी माणसाचा कम्प्युटरशी होणारा संवाद जरा 'प्रेमळ' होण्यासाठी काय करावं लागेल या कल्पनेतून एंगेलबर्टच्या नेतृत्वाखाली 'द ह्युमन फॅक्टर्स रिसर्च सेंटर'ची निमिर्ती स्टॅडफर्डमध्ये झाली होती. साधारण १९५० सालापासूनच कम्प्युटरबद्दलचा गूढपणा कमी करून तो सर्वसामान्यांना सहजपणे कसा वापरता येईल, या ध्यासाने एंगेलबर्ट नुसता झपाटून गेला होता. पण दुदैर्वाने त्याच्या प्रयत्नांना आथिर्क बळाची गरज असली तरी, ते कोण पुरवणार या प्रयत्नातच जवळजवळ एक दशकभर उलटून गेलं. पण एंगेलबर्टने त्याचे प्रयत्न सोडले नाहीत. शेवटी १९६२ साली जोसेफ लिकलायडर नावाच्या समविचारी संशोधकाने जेव्हा 'अॅडव्हान्स रिसर्च प्रोजेक्ट एजन्सी' (अर्पा) या इंटरनेटच्या जनक ठरणाऱ्या संस्थेची सूत्रं हाती घेतली, तेव्हा एंगेलबर्टचा प्रश्न मिटला. कीबोर्डला पर्याय म्हणून माऊससारखी अनेक उपकरणं एंगेलबर्टच्या टीमनं तयार केली. त्यातला माऊस सर्वांंना आवडला. बाकीची उपकरणं बाद ठरवली गेली. याचा एक गंमतीशीर नमुना म्हणजे पायानं चालवलं जाणारं शिवणयंत्र असतं तसं एक यंत्र कम्प्युटर वापरणाऱ्या माणसानं गुडघ्यानं दाबायचं आणि त्यानुसार कम्प्युटरचं काम चालेल असाही एक प्रयोग करून झाला!

अगदी पहिला माऊस छोट्या विटेसारखा दिसे. त्याच्या पाठीवर एक बटण आणि पोटावर दोन चाकं असत. बटण दाबून माऊस चालवणारा त्याचं काम करायचा. दोन पैकी एक चाक त्या माऊसची उभी हालचाल नियंत्रित करायचं. तर दुसरं चाकं आडवी. म्हणजेच माऊस हलवला की तो लांबी-रूंदी अशा दोन 'डायमेन्शन्स'मध्ये फिरायचा (आणि आजही फिरतो)! आणि त्या हालचालींंचं रूपांतर पडद्यावरच्या कर्सरच्या 'क्ष' आणि 'य' कोऑडिर्नेटस्मध्ये होतं आणि तो कर्सर हलतो. १९७३ साली झेरॉक्स कंपनीच्या 'पालो आल्टो रिसर्च सेंटर (पार्क)'नं एक छोट्या आकाराचा कम्प्युटर तयार केला. त्याबरोबर माऊसही विकला जाई. आता माऊसच्या पोटातली दोन चाकं गायब होऊन त्यांची जागा एका छोट्या चेंडूनं घेतली होती. या चेंडूची कुठल्या दिशेनं किती हालचाल होते यावरून कर्सरचं पडद्यावरचं स्थान माऊसचं हार्डवेअर ठरवतो. म्हणूनच माऊस नुसता हवेत फिरवला तर त्याचा काही परिणाम होत नाही. १९८४ साली अॅपलचा अतिशय सनसनाटी कम्प्युटर 'मॅकिन्टॉश' ऑपरेटिंग सिस्टिमबरोबर बाजारात आला आणि मल्टिमीडियाचं तंत्रज्ञान झपाट्यानं पसरलं, ज्यात माऊसचा वाटाही मोठाच होता.

माऊसचं काम कसं चालतं? जेव्हा आपण माऊस हाताने हलवतो तेव्हा कम्प्युटरवरच्या कर्सर नावाच्या बिंदूंची हालचाल होते. माऊसचा प्रकार कोणता, त्याप्रमाणे त्याचं तंत्रज्ञान बदलतं. जेव्हा कम्प्युटरच्या पडद्यावर एखाद्या ठिकाणी आपण माऊसचा पॉइंटर नेतो आणि क्लिक करतो तेव्हा एक प्रोग्रॅम त्यावेळी पडद्यावर माऊसचा पॉइंटर नेमका कुठे आहे हे हार्डवेअरच्या मदतीनं बघतो. मग त्यानुसार नक्की कशावर आपण क्लिक केलंय आणि त्यामुळे आता काय व्हायला हवं हे तो ठरवतो. उदाहरणार्थ, आपण जेव्हा एखाद्या टेक्स्ट बॉक्समध्ये कुठेही माऊसचा पॉइंटर नेऊन काही टाइप केलं किंवा क्लिक केलं तरीही त्या प्रोग्रॅमला ते बरोबर कळतं. कारण त्यासाठी तो टेक्स्ट बॉक्स कुठून कुठपर्यंत माऊसची क्लिक ओळखेल हे त्या प्रोग्रॅममध्ये लिहिलेलं असतं. माऊसचे तीन प्रकार म्हणजे 'मेकॅनिकल' 'ऑप्टिकल' आणि 'ऑप्टोमेकॅनिकल'.

मेकॅनिकल माऊस अगदी जुने. त्याच्या हालचाली आतली दोन यंत्र रेझिस्टर वीजप्रवाहातला बदल मोजतो तशी मोजतात.

ऑप्टिकल माऊसच्या पोटात मात्र चाक किंवा चेंडू दोन्ही नसतात. हा माऊस सतत पोटाच्या भागातून माऊसपॅडच्या दिशेनं प्रकाशझोत सोडत राहतो. हा प्रकाश माऊसपॅडवर पडतो. पूवीर् हे माऊसपॅड विशिष्ट पध्दतीचं असायचं. त्यावर अतिशय सूक्ष्म आकाराचे चौकोन असायचे. आपण माऊस हलवला की तो एका चौकोनातून दुसरीकडे जायचा. हे सगळं होत असताना माऊसच्या तळाशी बसलेला एक सेन्सर सतत माऊसपॅडकडून परत येणाऱ्या प्रकाशाची पातळी मोजायचा. माऊस हलवला की चौकोन बदलायचा, आणि त्यासरशी माऊसपॅडवरून सेन्सरकडे परत येणाऱ्या प्रकाशाची पातळीही. त्यावरून माऊसमधली इलेक्ट्रॉनिक यंत्रणा माऊसची उभी-आडवी हालचाल 'मोजायची'. (किती उभे, किती आडवे चौकोन ओलांडले?) आता अशा माऊसपॅडची गरज नसते.

ऑप्टोमेकॅनिकल माऊसचं कामं आधीच दोन्ही प्रकार एकत्र करून चालतं. म्हणजेच पोटातला चेंडू आडवा-उभा फिरला की त्याप्रमाणात प्रकाश माऊसपॅडकडून परत येतो. आणि प्रकाशाच्या बदलत्या पातळीनुसार त्याची उभी-आडवी हालचाल 'मोजली' जाते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: