kd Mumbai

निवृत्ती

सलग १२ वर्षे 'जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती' म्हणून बिल गेट्स यांनी कमावलेला मान कदाचित अन्य कोणी भविष्यात मिळवेलही. परंतु ऑफिसमध्ये, घराघरांत दिसणाऱ्या पर्सनल कम्प्युटरला जिव्हाळ्याचा बनवणारा मायक्रोसॉफ्टचा कर्ताधर्ता ही त्यांची ओळख कधीच पुसली जाणार नाही.

शुक्रवार २७ जूनचा दिवस बिल गेट्सच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा दिवस ठरला. स्वत:च उभारलेल्या मायक्रोसॉफ्टचा पूर्णवेळ कर्मचारी म्हणून त्यांनी वयाच्या ५२व्या वषीर् स्वेच्छानिवृत्ती घेतली. ते मायक्रोसॉफ्टचे चेअरमन राहतील, कंपनीच्या सर्वात जास्त शेअर्सचा मालकीहक्कही त्यांच्याकडेच आहे. मात्र आयुष्यभर केवळ नंबर वनच्या स्पधेर्त झोकून देणारे बिल गेट्स आता आठवड्यातून एकदाच कंपनीत येतील. आता त्यांनी आपल्या जीवनाचे ध्येय बदलून टाकलेय. स्वत:च स्थापन केलेल्या आणि जागतिक आरोग्य आणि शिक्षणासाठी काम करणाऱ्या 'बिल अँड मेलिंडा गेट्स' संस्थेच्या समाजोपयोगी कार्याला वाहून घेतील. तरीही बिल गेट्स हे नाव अजरामरच ठरेल. मायक्रोसॉफ्ट विंडोज तितकेसे उत्कृष्ट नसल्याचे तज्ज्ञ सांगत असले तरी सध्या विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमच्या एक अब्जाहूनही अधिक प्रती जगभरातील पर्सनल कम्प्युटरवर आहेत. नेटवर्कची ताकद आणि तंत्रज्ञानाचा व्यापक पाया या दोन बाबींमुळे बिल गेट्सने तंत्रज्ञान अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवलं. इमेल सुविधा आणि टेलिफोन ही त्यांची उत्तम उदाहरणं. तंत्रज्ञानाच्या या व्यासपीठावर इतरांचे प्रॉडक्ट्स आणि सेवांना स्थान देऊन ते जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम त्यांनी केले. विंडोजवर डॉक्टर, रिटेल, फॅक्टरीसाठी वापरण्यात येणारे अन्य विशेष अॅप्लिकेशन प्रोग्रॅमही वापरता येतात, ही विंडोजची उल्लेखनीय बाब! सध्या या कंपनीसमोर अनंत अडचणी उभ्या ठाकल्या आहेत. पर्सनल कम्प्युटर ते इंटरनेट अशा तंत्रज्ञानाच्या होणाऱ्या 'शिफ्टिंग'चे स्वत: बिल गेट्स साक्षी आहेत. कम्प्युटरवर होणारी कामं लाखो टेक्नोसॅव्ही लोक सेलफोनवर करू लागलेत.

मायक्रोसॉफ्टनंतर बऱ्याच काळाने स्थापन झालेल्या गुगलने मायक्रोसॉफ्टला केव्हाच पिछाडीवरच टाकलेय. अमेरिकेमध्ये इंटरनेट सर्चमधला मायक्रोसॉफ्टचा शेअर १० टक्क्यांपेक्षाही कमी तर गुगलचा तब्बल ६० टक्के आहे. त्यात याहूसोबत फिसकटलेल्या कराराची भर पडलीय. मायक्रोसॉफ्टची कमी होणारी संपत्ती आणि वर्चस्व पुन्हा मिळवून देण्याचे शिवधनुष्य आता मायक्रोसॉफ्टच्या उत्तराधिकाऱ्यांना पेलायचे आहे. एकेकाळी 'सेंटीबिलियनर' हे बिरूद मिरवणाऱ्या बिल गेट्सची संपत्ती १९९९मध्ये १०० दशलक्ष डॉलर होती. मायक्रोसॉफ्टचे गडगडलेले शेअर्स आणि स्वत:च्या संस्थेला दिलेल्या भरघोस देणग्यांमुळे त्याच्याकडे निम्मीच संपत्ती उरली आहे. पण याची खंत त्यांना नाही. ते आता मलेरिया आणि एड्स रोगांचे उच्चाटन करण्याच्या कामाला वाहून घेणारेत. आपल्यानंतर 'मायक्रोसॉफ्ट'चे काय होणार हा प्रश्ान् त्यांना सतावत नाही. कारण कंपनीच्या क्षमतेवर त्यांना पूर्ण विश्वास आहे...

वाटचाल!

२८ ऑक्टोबर १९५५ : सिऍटलमधील विल्यम हेन्री आणि मेरी मॅक्सवेल या गेट्स दाम्पत्यांच्या घरी जन्म.

१९६८: प्रतिष्ठित लेकसाइड शाळेत दाखल. आठव्या इयत्तेतच प्राथमिक जीई कम्प्युटरवर पहिल्या प्रोग्रॅमचे लिखाण. पीडीपी-१०कम्प्युटर वापरण्यावर निर्बंध असणाऱ्या चार विद्यार्थ्यांपैकी एक. कम्प्युटर अधिक वेळ वापरता यावा यासाठी कम्प्युटर यंत्रणेतील त्रुटींचा गैरफायदा घेतल्याची शिक्षा.

१९७२: वयाच्या १७व्या वषीर् शाळेतील सहकारी पॉल अॅलनसोबत 'ट्रॅफ-ओ-डाटा'ची निमिर्ती.

१९७३: शाळेतून गॅज्युएशन पूर्ण. एसएटी (सॅट)मध्ये १६००पैकी १५९० मार्क्स. हार्वर्ड विद्यापीठात प्रवेश. तिथेच भविष्यातील पार्टनर स्टीव्ह बॉलमर याची भेट.

१९७५: इंटेलने 'इंटेल ८०८० सीपीयू' आणि २०० डॉलरपेक्षाही कमी किमतीत पहिली कम्प्युटर चीप बाजारात आणल्यानंतर अॅलनच्या सोबतीने 'मायक्रो-सॉफ्ट' ही सॉफ्टवेअर कंपनी स्थापन. एमआयटीएसतफेर् बनल्या जाणाऱ्या मायक्रोकम्प्युटरचा बेसिक प्रोग्रॅम बनवण्यासाठी हार्वर्ड विद्यापीठाला कायमचा रामराम.

फेब्रुवारी १९७६: विकसित केलेले 'बेसिक सॉफ्टवेअर' बाजारात दाखल होण्याआधीच अतिउत्साही लोकांकडून प्री-माकेर्ट सॉफ्टवेअर मोठ्या प्रमाणावर कॉपी केले जाऊ लागल्याने अशांना खुले पत्र. 'मोबदला मिळाल्याशिवाय एमआयटीएस चांगल्या दर्जाचे सॉफ्टवेअर बनवू शकत नाही', अशा आशयाच्या पत्राने अनेकांना राग पण यावरूनच चाचेगिरीबाबत असणारी बिल यांची ठाम भूमिका अधोरेखित.

२६ नोव्हेंबर १९७६: 'मायक्रोसॉफ्ट' या नावाची नोंदणी. या सुमारासच एमआयटीएसची स्वतंत्र कंपनी नावारुपाला.

१९८०: बाजारात येऊ घातलेल्या आयबीएम पर्सनल कम्प्युटरसाठी 'बेसिक' दुभाष्या बनवण्याचे काम. मायक्रोसॉफ्टने सिऍटल कम्प्युटर प्रोडक्ट्सकडून 'ओएस, ८६ डॉस' विकत घेऊन, विकसित करून पीसी-डॉसची निमिर्ती आणि आयबीएमला ८० हजार डॉलर किमतीला विक्री. एमएस-डॉस ची विक्रमी विक्री कारकीदीर्तला मैलाचा दगड.

२५ जून १९८१: मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष आणि चेअरमन.

२० नोव्हेंबर १९८५: मायक्रोसॉफ्ट विंडोज दाखल. थोडीफार लोकप्रियता परंतु अॅपलच्या तुलनेत पिछाडीवरच.

नोव्हेंबर १९८७: विंडोज २.० दाखल. जानेवारी १९८८मध्ये विंडोज २.०३. अॅपलकडून कॉपीराइट भंगाचा दावा दाखल.

१९९०: वापरण्यास सहजसोप्या अशा विंडोज ३.० ची निमिर्ती. उदंड यश. पहिल्या सहा महिन्यांत २० लाख कॉपींची विक्री. मार्च १९९२मध्ये विंडोज ३.१ची निमिर्ती. इथूनच पुढच्या देदिप्यमान यशाची सुरुवात.

एक जानेवारी १९९४: मेलिंडा फ्रेन्चशी विवाह. जेनिफर (१९९६), रॉरी (१९९९) आणि फोएब (२००२) ही तीन मुलं.

१९९५: विंडोज-९५सह इंटरनेट एक्स्प्लोरर बाजारात दाखल. सर्वाधिक वापरला जाणारा वेब ब्राउजर म्हणून १९९९मध्ये नोंद.

१९९५: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून फोर्ब्सतफेर् जाहीर. २००७पर्यंत नंबर वनच. १९९९मध्ये संपत्ती १०१ अब्ज डॉलरपेक्षा जादा. मिडियाने दिले 'सेंटीबिलियनर' हे नवे बिरुद.

१८ मे १९९८: 'मक्तेदारी प्रतिबंधक कायद्या'चा भंग केल्याप्रकरणी अमेरिकेच्या न्याय विभाग व २० राज्यांतफेर् दावा दाखल. मायक्रोसॉफ्टचे विभाजन करण्याचा कोर्टाचा आदेश. अपिलानंतर कोर्टाकडून आदेश मागे.

२०००: 'द बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन' या समाजोपयोगी संस्थेची स्थापना.

१५ जून २००६: आगामी दोन वर्षात मायक्रोसॉफ्टच्या दैनंदिन कामांतून स्वत: बाहेर पडण्याची घोषणा.

२७ जून २००८: मायक्रोसॉफ्टच्या चेअरमनपदावरून पायउतार. पार्टटाइम चेअरमन म्हणून काम पाहणार.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: