kd Mumbai

व्हायरसपुराण

कम्प्युटरमध्ये व्हायरस नेमका कसा शिरतो आणि काय विध्वंस करतो, हे जाणणे महत्त्वाचे आहे. कारण त्याशिवाय अँटिव्हायरसचं महत्त्व लक्षात येत नाही.

जगातील पहिला व्हायरस कम्प्युटरमध्ये कधी शिरला ते सांगणे कठीण आहे; पण १९७०च्या दशकाच्या सुरुवातीस क्रीपर नावाचा व्हायरस आल्याची नोंद सापडते. मोडेमद्वारे तो कम्प्युटरमध्ये घुसला आणि स्क्रीनवर अक्षरे झळकली... 'मी क्रीपर आहे. शक्य असेल तर मला पकडून दाखवा...' त्यानंतर व्हायरस हा प्रकार लोकांना माहीत झाला. या क्रीपरला हटविणे गरजेचे होते. शेवटी 'रिपर' नावाचा दुसरा व्हायरस तयार करण्यात आला. त्याने या क्रीपरला मारून टाकले. हे व्हायरस कोणी तयार केले आणि त्यांचे काय कसे चालले, हे अज्ञात आहे. पुढे १९७४मध्ये 'रॅबिट' नावाचा व्हायरस कम्प्युटरमध्ये शिरला. एका कम्प्युटरला लागण झाल्यावर त्या नेटवर्कमध्ये असणारे अन्य कम्प्युटरही वेगाने आजारी पडायला लागले. म्हणून व्हायरसचे नाव 'रॅबिट' ठेवले गेले. १९७५मध्ये 'परव्हेडिंग अॅनिमल' नावाचा एक गेम बाजारात आला होता. तो कम्प्युटरमधला पहिला 'ट्रोजन' मानला जातो. म्हणजे कम्प्युटरमध्ये लपून कम्प्युटरबद्दलची सगळी माहिती गोळा करायची, हा त्याचा उद्योग. या गेमची निमिर्ती करताना त्यातील त्रुटीमुळे त्याचे स्वरूप ट्रोजनसारखे झाले की मुद्दामच त्याची निमिर्ती तशी केली गेली हे सांगणे कठीण आहे.

पुढे १९८२मध्ये 'अॅपल २ सिस्टिम'साठी 'एल्क क्लोनर' नावाचा एक प्रोग्रॅम लागू केला गेला. तो अगदीच कमकुवत होता. त्यामुळे त्यावषीर् कम्प्युटरमध्ये मोठ्या प्रमाणावर व्हायरस शिरले. मोठ्या प्रमाणावर व्हायरसचा फटका बसण्याचे ते पहिले वर्ष होते. मुळात व्हायरस हा शब्द लेन इडलमन यांनी तयार केला. कम्प्युटरमधले इन्फेक्शन या अर्थाने त्यांनी तो वापरला. १९८३मध्ये त्यांनी एक प्रात्यक्षिक दाखवून व्हायरस कसे काम करतो, हे दाखवून दिले. हा व्हायरस कम्प्युटरमध्ये सोडल्यावर प्रेक्षकांना प्रथमदर्शनी काहीच कळत नाही; पण नंतर त्याने कम्प्युटरमधला एक एक प्रोग्रॅम 'खाऊन' टाकायला सुरुवात केली, तेव्हा व्हायरस हा प्रकार काय करू शकतो ते लक्षात आले.

जानेवारी १९८६मध्ये 'द ब्रेन बूट सेक्टर व्हायरस' (दुसरे नाव पाकिस्तानी फ्ल्यू; कारण तो पाकिस्तानातील दोन १९ वषीर्य भावांनी तयार केला होता) हा व्हायरस कम्प्युटरमध्ये शिरला. आयबीएमचे कम्प्युटर इन्फेक्ट करणारा तो पहिला व्हायरस होता. यानंतर व्हिएन्ना व्हायरस, जेरूसलेम व्हायरस, घोस्टबॉल अशा नावाने व्हायरसमंडळी धिंगाणा घालतच राहिली. १९९२मध्ये मायकलअँजेलो नावाचा एक व्हायरस आला. त्याची बरीच हवा निर्माण करण्यात आली; पण प्रत्यक्षात त्याने फारसा विद्ध्वंस केला नाही. २००० साली 'आयलव्हयू' नावाच्या व्हायरसने जवळपास दहा अब्ज डॉलरचे नुकसान केले. यानंतरही अनेक व्हायरस येत राहिले आणि कम्प्युटरधारकांच्या मनात धडकी भरवत राहिले.

पहिला व्हायरस कोणी तयार केला हे अज्ञात असले, तरी व्हायरसवर मात करणारा पहिला प्रोगॅम कोणी तयार केला ते मात्र सांगता येते. र्बन्ट फिक्स यांनी १९८७ साली पहिला अँटिव्हायरस तयार केला, तो व्हिएन्ना व्हायरसला हटविण्यासाठी. १९८८मध्ये ब्रिटिश नागरिक अॅलन सॉलोमन यांनी 'डॉ. सॉलोमन्स अँटिव्हायरस टूलकिट' नावाने अँटिव्हायरस सॉफ्टवेअर आणले. दोन वर्षांतच अशी १९ व्हायरसविरोधी सॉफ्टवेअर बाजारात आली. यामध्ये नॉर्टन अँटिव्हायरस आणि मॅकअॅफी कंपनीचा अँटिव्हायरस यांचाही समावेश आहे.

विशेष म्हणजे टिपेट नावाच्या एका डॉक्टरने अँटिव्हायरस शोधून काढण्यात खूप मदत केली. तो डॉक्टर 'सर्टस इंटरनॅशनल कंपनी' नावाची एक कम्प्युटर सॉफ्टवेअर कंपनीही चालवायचा. मानवी शरीरावर हल्ला करणारे विषाणू व साथीचे आजार आणि कम्प्युटरमधले व्हायरस यांचा काही संबंध आहे का असा विचार त्याने केला. माणसांत आजाराची साथ का पसरते याचा विचार करता करता कम्प्युटरमध्येही नेमका व्हायरस का व कसा पसरतो, याचा अभ्यास त्याने केला. मग त्याने भराभर 'अँटिव्हायरस सॉफ्टवेअर' आणायला सुरुवात केली. १९९२मध्ये त्याने आपली कंपनी 'सिमँटेक कॉपोर्रेशन'ला विकली. त्याची सर्व अँटिव्हायरस सॉफ्टवेअर्स आताच्या नॉर्टन अँटिव्हायरसमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत.

शॉर्टकट : कीबोर्डवरील विंडोज कीबद्दल मागे लिहिले होते. त्यातीलच काही शॉर्टकट. विंडोज लोगो आणि ई अक्षराची की दाबली की विंडोज एक्स्प्लोरर सुरू होतो. कम्प्युटरमधले सगळे ड्राइव्ह तुम्हाला दिसू शकतात. त्यातील फाइल एकातून दुसऱ्यात टाकण्यासाठी हा मार्ग सुलभ ठरतो. विंडोज लोगो व एफ अक्षराची की दाबली की सर्च बॉक्स ओपन होतो. त्यात तुम्ही कम्प्युटरमध्ये असणाऱ्या कोणत्याही फाईलचा शोध घेऊ शकता. विंडोज लोगो आणि डी अक्षराची की दाबली की ओपन असलेल्या सगळ्या विंडोज बंद होतात आणि डेस्कटॉप दिसतो. हे सगळे शॉर्टकट्स इंटरनेटवर उपलब्ध आहेत. विंडोज शॉर्टकट्स असा सर्च दिला की हे सारे शॉर्टकट्स तुमच्यापुढे हजर होतील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: