मांजर भिंतीच्या एका टोकापासून दुसरीकडे जाताना दाखवायचं असेल, तर मांजर भिंतीच्या एका टोकाला, नंतर थोडं पुढे ङक्त असं करत करत ते शेवटी दुसऱ्या भिंतीपाशी जातंय अशी अनेक चित्रं काढायची. जर हा प्रवास मांजर १० सेकंदात करतंय असं दाखवायचं असेल तर यासाठी ३० ३ १० = ३०० चित्रं काढायची. ती 'शूट' करून रिळावर ठेवायची आणि ही कार्टून फिल्म दर सेकंदाला ३० चित्रं या वेगानं दाखवली, की आपल्याला १० सेकंदात ते मांजर सलगपणे या भिंतीकडून त्या भिंतीकडे जातंय असं वाटतं
आपल्या डोळ्याच्या पडद्यावर पडणारी प्रतिमा फक्त १/३० सेकंद एवढाच वेळ टिकू शकते. त्यामुळे जर एक प्रतिमा पुसली जाण्याच्या आत दुसरी आणि दुसरी पुसली जाण्याच्या आत तिसरी अशा जर प्रतिमा आपल्या डोळ्यावर पडत गेल्या तर आपल्या डोळ्याला सलगतेचा भास निर्माण होतो. पूवीर्च्या काळी थम्सअपच्या बाटल्यांची बुचं जमवल्यावर 'सुनील गावस्कर बॅटने फटका मारतोय' अशी सलग वाटणारी 'मोशन' दाखवणारी पुस्तकं मिळायची. त्या पुस्तकाच्या पहिल्या पानावर गावस्कर बॅट जमिनीला टेकवलेला, नंतरच्या चित्रात बॅट थोडीशी वर उचललेली, नंतर थोडी आणखी जास्त उचललेली आणि शेवटी बॅटनी तो बॉलला फटकावतोय असं दाखवणारी खूप बारीक फरकांची अनेक चित्रं त्या पुस्तकाच्या वेगवेगळ्या पानावर काढलेली असत. मग ती पान फर्रकन् त्या पुस्तकातून डोळ्यासमोरून नेली की आपल्याला गावस्कर सलगपणे बॅटनं फटका मारतोय असं वाटायचं. अलिकडच्या 'तारे जमीन पर' मध्येही असंच पुस्तक ईशानची आई-बाबा-दादा यांच्यापासून होणारी फारकत दाखवतं.
अॅनिमेशनच्या कार्टून फिल्म्समध्ये हेच तत्त्व वापरलं जातं. १९०६ साली 'स्टुअर्ट ब्लॅकटन' नावाच्या माणसाने हाताने काढलेली थोड्या फरकांची चित्रं एकापाठोपाठ भराभरा दाखवून 'अॅनिमेशन'ची सुरूवात केली. त्याचा 'ह्युमरस फेजेस ऑफ फनी फेसेस' हा सिनेमा जगातला पहिला 'अॅनिमेटेड' सिनेमा मानला जातो. यातून स्फूतीर् घेऊन एमिल कोल नावाच्या फ्रेंच कलाकाराने १९०८ साली 'फॅंटासमॅगॉरी' नावाची अॅनिमेटेड फिल्म काढली. त्यात एक छोटीशी आकृती वेगवेगळे आकार धारण करतेय (उदाहरणार्थ बाटली, फूल) असं अॅनिमेशन दाखवलं होतं. यानंतर अॅनिमेशनने जोर पकडला! १९१२ साली रशियात जन्मलेल्या 'लॅडिस्लांस स्टेअरविच' नावाच्या दिग्दर्शकानं बाहुल्यांचं अॅनिमेशन असणारा पहिला सिनेमा काढला. त्यानंतर १९१७ साली अजेर्ंटिनाच्या क्विरीनो क्रिस्टीआनीने 'अल अपोस्टोल' नावाची फक्त अॅनिमेशन असणारी 'फीचर फिल्म' काढली.
वॉल्ट डिस्ने कार्टून फिल्म्समुळेच जगप्रसिध्द झाला. १९०१ साली एका गरीब कुटुंंबात जन्मलेल्या डिस्नेने लहानपणी शेती, वृृत्तपत्रं वाटणं वगैरे बरेच उद्योग केले. मग आर्ट स्कूलमध्ये लोकांची व्यंगचित्रं विकून तो पैसे मिळवायचा. पण त्याचा खरा उदय काही वर्षांनी कॅन्सास सिटीत आल्यावर झाला. तिथे एक जाहिराती बनवणारी कंपनी मुख्य सिनेमा सुरू होण्यापूवीर् पेक्षकांचं मनोरंंजन करण्यासाठी दाखवल्या जाणाऱ्या अॅनिमेशन फिल्म्स बनवी. डिस्ने इथेच अॅनिमेशनचं तंत्रज्ञान शिकला. अर्थात यानंतरही त्याच्या आयुष्यात अनेक चढउतार आले. काही वर्षांनी 'मिकी माऊस' गवसल्यावर मात्र त्याचं नशीब उजळलं! शेकडो चित्रकार त्याच्या गराजमध्ये चित्रं काढत बसत. मांजर भिंतीच्या एका टोकापासून दुसरीकडे जाताना दाखवायचं असेल, तर मांजर भिंतीच्या एका टोकाला, नंतर थोडं पुढे ङक्त असं करत करत ते शेवटी दुसऱ्या भिंतीपाशी जातंय अशी अनेक चित्रं काढायची. जर हा प्रवास मांजर १० सेकंदात करतंय असं दाखवायचं असेल तर यासाठी ३० ३ १० = ३०० चित्रं काढायची. ती 'शूट' करून रिळावर ठेवायची आणि ही कार्टून फिल्म दर सेकंदाला ३० चित्रं या वेगानं दाखवली, की आपल्याला १० सेकंदात ते मांजर सलगपणे या भिंतीकडून त्या भिंतीकडे जातंय असं वाटतं. म्हणजे १ तासाच्या कार्टून फिल्मसाठी ६० ३६०३३० = १०८००० चित्रं काढावी लागतील!
जेव्हा आपण व्हीडिओ कॅमेऱ्यातून शूट होणारं एखादं चित्रं टीव्हीवर बघतो तेव्हातर गंमतच होते. ती प्रतिमा आहे तशीच दाखवली जात नाही. त्याऐवजी आपल्या टीव्हीच्या पडद्याचे दोन भाग केले जातात. एकात फक्त विषम ओळींवरचे ठिपके (पहिली, तिसरी,पाचवी -असं करत पाचशे पंचविसावी) पहिल्या सेकंदाला साठ वेळा दाखवले जातात, तर लगेच त्यापाठोपाठ फक्त सम ओळींवरचे ठिपके (दुसरी, चौथी, सहावी असं करत पाचशे चोविसावी) दुसऱ्या सेकंदाला साठ वेळा दाखवले जातात. मग तिसऱ्या सेकंदाला पुन्हा फक्त विषम, चौथ्या सेकंदाला पुन्हा फक्त सम, असे ठिपके दाखवले जात राहतात. त्यामुळे दर दोन सेकंदांमध्ये आपल्याला पूर्ण स्क्रीनवरचे सगळे ठिपके साठवेळा म्हणजेच सेकंदाला तीस या वेेगानं दिसतात. आणि मग अॅनिमेशनच्या तत्त्वाप्रमाणे आपल्याला त्या प्रतिमा सलग वाटतात.
आपण बघत असतो त्या 'स्पेशल इफेक्ट्स'मध्ये हेच होतं. कार्टूनमधलं मांजर खरं नसतं, तसंच जेव्हा जाहिरातीत एखादी टूथपेस्ट चक्क खालून वर जाते असं दाखवतात तेही हे 'अॅनिमेशन' वापरूनच! नाहीतर 'माझ्या गुरूत्वाकर्षणाचा काय खेळ चालवलाय?' म्हणून न्यूटन त्याच्या थडग्यात गोलगोल फिरायला लागेल!
फ्रेंच सिनेमे बनवणारा जॉजेर्र्स मेलियेस हा एकदा एक स्पेशल इफेक्टस्् असणारा सिनेमा बनवत होता. त्यात एक बस एकीकडून दुसरीकडे जात असल्याचं शूटिंग सुरू असताना अचानक कॅमेरा बंद पडला. नंतर तो दुरूस्त झाल्यावर पुन्हा शूटिंंग सुरू झालं, तर त्यावेळी नेमका एक घोडा एकीकडून दुसरीकडे जात असल्याचं शूटिंग झालं. त्यामुळे बसचं घोड्यात रूपांतर होतंय असा भास करणारं शूटिंग झालं. आणि स्टॉप मोशन अॅनिमेशनची सुरूवात झाली! ज्यूरॅसिक पार्क या स्पीलबर्गच्या अप्रतिम सिनेमात रोबोज आणि कम्प्युटर अॅनिमेशनचं बेमालूम मिश्रण केलेलं होतं.
आता कम्प्युटर वापरून हे काम बऱ्यापैकी सोपं झालंय. कम्प्युटर अॅनिमेशनमध्ये चित्रं वगैरे कम्प्युटरवर काढता तर येतातच, पण त्याशिवाय, इनबिट्विनिंग म्हणून एक गंमतीचा प्रकार असतो. त्यात काय होतं की आपण फक्त सुरूवातीचं (उदाहरणार्थ,मांजर बसलीये) आणि शेवटचं (मांजर दुसऱ्या बाजुला पोहोचलीये) चित्र काढायचं. मधली सगळी चित्रं मग अॅनिमेशन सॉफ्टवेअर काढतं! ती कटकट आपल्याला करत बसायची गरज नसते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा