kd Mumbai

नेटभ्रमंती!

नेटवरून बुकिंग केले व लांबच्या ठिकाणच्या हॉटेलवर गेल्यावर आपल्याला प्रवेश नाकारला गेला वा अन्य काही समस्या उभ्या केल्या तर काय करायचे अशी भीती वाटते, हे खरे. तरीही केंद सरकारने व जवळपास प्रत्येक राज्याने स्वत:च्या पर्यटनविषयक वेबसाइट्स ओपन केल्या आहेत, त्याचा लाभ घ्यायला काहीच हरकत नाही.

शाळांच्या परीक्षा संपल्या, रिझल्टही लागले आणि सुटीचा ख-या अर्थाने आनंद उपभोगायला बच्चेकंपनी तयार झाली; यालाही आता आठवडा उलटला. बहुतांश लोकांनी अगदी मामाच्याच नव्हे पण कोणत्यातरी बाहेरगावी जाण्याची तयारी केली. बाहेरगावी जाण्याचे बुकिंग आता कम्प्युटरवरूनच होते. त्यामुळे पुरेशी पारदर्शकता साऱ्या व्यवहारात येते. पण विमान, रेल्वे वा एसटीची तिकिटे कम्प्युटरवरून काढणे यात काहीच नावीन्य राहिलेले नाही. आता लोकलचीही तिकिटे कम्प्युटरवर मिळतात. पण संपूर्ण दौऱ्याचे बुकिंग (हॉटेल, वाहतूक, अन्य सुविधा वगैरे) नेटवरून करणे हे अजूनही नवीन आहे. काहीजण या मार्गाने आपले बुकिंग करतातही; पण अजून या मार्गाला राजमान्यता मिळालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे.

सरकारी व काही खाजगी पर्यटनसंस्थांकडे गेल्यास अधिक सुरक्षित बुकिंग होते हे खरे आहे. नेटवरून बुकिंग केले व लांबच्या ठिकाणच्या हॉटेलवर गेल्यावर आपल्याला प्रवेश नाकारला गेला वा अन्य काही समस्या उभ्या केल्या तर काय करायचे अशी भीती वाटते, हेही खरे. तरीही केंद सरकारने व जवळपास प्रत्येक राज्याने स्वत:च्या पर्यटनविषयक वेबसाइट्स ओपन केल्या आहेत, त्याचा लाभ घ्यायला काहीच हरकत नाही. या वेबसाइटवरून हॉटेलचे व सर्व पॅकेजेसचे बुकिंग होते. ते बरेचसे विश्वासार्ह असते. आपल्याला एखाद्या ठिकाणची माहिती हवी असेल, तेथे कसे जायचे, जायला किती वेळ लागेल वगैरे माहिती हवी असेल तर ती साइटवर मिळते. ती माहिती अद्ययावतही होत राहते. त्यामुळे बरीच विश्वासार्ह माहिती मिळते. आपल्याला ज्या राज्यात जायचे आहे त्या राज्याचे नाव देऊन गूगलला सर्च दिलात की या वेबसाइट्स दिसतील. काही वेबसाटइट्स नमुन्यादाखल देत आहे. मात्र या किंवा अन्य कोणत्याही वेबसाइटवरून व्यवहार करताना वेबसाइटचा खरेपणा पडताळून पाहण्याची जबाबदारी मात्र तुमची!

indiatourism.com

tourismindia.com

keralatourntravel.com

keralatravels.com

tourisminindia.com/indiathedestination/index.html

rajasthantourismindia.com

jktourism.org/cities/kashmir/index-k.html

शक्यतो राज्य सरकारची अधिकृत टूरिझम साइट ओपन केलीत की धोका अगदी कमी असे समजा. या व इतर साइटचा फायदा तुम्हाला दिवाळीच्या सुटीतल्या फेरफटक्यासाठी निश्चित होईल. ऑल द बेस्ट. आता काही वाचकांच्या प्रश्ानंना उत्तरे.

एखादी फाइल दुसरीकडे पाठवताना ती झिप करून पाठवावी हे मी मागेच सांगितले होते. झिप फाइल झाल्यावर त्याची साइझ कमी होते आणि फाइल सुलभपणे जाते. फोटोचा साइझही कमी करून कसा पाठवता येतो हे आपण गेल्या वेळेस पाहिले. परंतु, हेमंत पंचाक्षरी यांनी मेल पाठवून संपूर्ण फोल्डर मेलवर अटॅचमेंट म्हणून का पाठवता येत नाहीत असे विचारले आहे. फोल्डर हा अटॅचमेंट म्हणून पाठवता येत नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यावर उपाय हा की तो फोल्डर ओपन करावा. त्यातल्या साऱ्या फाइल्स दिसतील. त्या कंट्रोल ए करून सिलेक्ट करून त्याची झिप फाइल करावी व ती पाठवावी. म्हणजे पूर्ण फोल्डरच अशा मार्गाने पाठवला याचे समाधान मिळेल.

गीता शहा आणि अजित वागळे यांनी अँटिव्हायरसबद्दल प्रश्ान् विचारले आहेत. याहूचा मेसेंजर ओपन केल्यावर शहा यांच्या नकळत काही फाइल्स दुसऱ्या व्यक्तींना पाठवल्या जातात. हा व्हायरसचा प्रकार आहे असे समजून त्यांनी मशीनमधला नॉर्टन अँटिव्हायरस पूर्णपणे चालविला. तरीही हे प्रकार चालू राहिले. असे का होत आहे हा त्यांचा प्रश्ान् आहे. नॉर्टन हा चांगला अँटिव्हायरस आहे. पण इथे काही शक्यता संभवतात. (जाणकारांनी अधिक भर टाकावी) हा नॉर्टन अपटूडेट नसला तर हा प्रश्ान् संभवतो. अँटिव्हायरस कोणताही असला तरी तो अपटूडेट हवा. इथे तो चालवला असला तरी त्याच्या डेफिनिशन्स अपडेट नसल्या तर काही उपयोग होणार नाही. इथे व्हायरस शिरला आहे हे खरे आहे. नॉर्टन हा लाइव्ह अँटिव्हायरस आहे. म्हणजे व्हायरस मशीनमध्ये शिरताक्षणी त्याचा बंदोबस्त केला जातो. इथे तो झालेला नाही. नॉर्टन अपडेट झाल्यावर पुन्हा स्कॅन करता येईल. मशीन 'सेफ मोड'मध्ये सुरू करून पूर्णपणे स्कॅन केल्यास कदाचित व्हायरस जाईल. तरीही व्हायरस निघून गेला नाही तर त्याचा अर्थ नॉर्टनकडे त्याला घालविण्याची क्षमता नाही. मग नॉर्टन पूर्णपणे मशीनमधून काढून टाकून मॅक्अॅफीसारखा दुसरा प्रभावी अँटिव्हायरस लोड करावा लागेल. याच संदर्भात वागळे यांचा प्रश्ान् आहे. एखादा चांगला अँटिव्हायरस मशीनमध्ये असला व त्याने व्हायरस निघून जात नसला तर काय करावे असा त्यांचा प्रश्ान् होता. या प्रश्ानचे उत्तरही इथेच मिळाले आहे. काही वेळा एकच अँटिव्हायरस पुरेसा पडत नाही. अशावेळी एकापेक्षा जास्त अँटिव्हायरस डाऊनलोड करावे लागतात. त्यांची यादी मी गेल्यावेळी दिलीच आहे.

किशोर काकडे यांनी असे म्हटले आहे की त्यांनी मशीन सुरू केल्यावर उजव्या बाजूला 'मेटकॅफे'चा प्रोग्रामही लोड होतो. तो आपोआप लोड झाला आहे. त्यावर क्लिक करून त्यांनी कामही केले. अशा अनाहूत प्रोग्राम्सवर काम करावे का असा त्यांचा प्रश्ान् आहे. याचे उत्तर सरळ 'नाही' असेच आहे. असे प्रोग्राम दुसरा एखादा प्रोग्राम डाऊनलोड करताना मशीनमध्ये येतात. उदा. सीक्लीनर सॉफ्टवेअर डाऊनलोड करताना याहूचा टूलबारही डाऊनलोड करायचा आहे का असे विचारले जाते. असेच इतर काही सॉफ्टवेअरबाबतही होते. यातूनच काही जेन्युइन सॉफ्टवेअर डाऊनलोड होते. प्रत्येक वेळेस ते हानिकारकच असेल असे नाही. माहीत नसलेल्या सॉफ्टवेअरबाबत मात्र धोका पत्करू नये. 'मेटकॅफे'वर विविध व्हीडिओ दिसतात. ते निधोर्क आहेत याची खात्री पटल्याशिवाय चालवू नयेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: