१९४०च्या दशकाच्या शेवटी बर्नार्ड सिल्व्हर आणि नॉर्मन वूडलॅंड यांनी बार कोडच्या तंत्रज्ञानाची मुळं रोवली. त्यानंतर बऱ्याच उलथापालथी होऊन २६ जून १९७४ रोजी 'मार्श सुपरमाकेर्ट' या ट्रायमधल्या दुकानात च्युइंगगम बार कोडचा वापर करून विकली जाणारी पहिली वस्तू ठरली.
अलिकडे सर्वत्र शॉपिंग मॉल्स आणि सुपर मार्केट यांचा झगझगाट असतो. अशा दुकानांमध्ये आपण काही खरेदी करून बिलाच्या काऊंटरवर गेलो की तिथला माणूस आपण खरेदी केलेल्या सगळ्या वस्तू एकामागून एक अशा एका 'स्कॅनर' नावाच्या यंत्राजवळ नेतो. त्या यंत्राचं त्या वस्तूवरच्या एका छोट्या कागदाशी काहीतरी संभाषण होतं. मग बारिकसा आवाज येऊन त्या वस्तूचं नाव, तिची किंमत वगैरे गोष्टी कॅशियरच्या कम्प्युटरच्या पडद्यावर उमटतात. या सगळ्या जादूमागे हात असतो तो 'बार कोड' तंत्रज्ञानाचा! या तंत्रज्ञानामुळे आपण साबण विकत घेतलाय की टूथपेस्ट, हे तर दुकानातल्या कम्प्युटरला कळतंच, पण त्या माहितीचा त्या दुकानदाराला खूप छान वापरही करता येतो. कारण कुठलं उत्पादन किती प्रमाणात विकलं जातंय, इतकंच नव्हे तर कुठल्या वारी, कुठल्या वेळेला ते जास्त विकलं जातं? अशा अनेक प्रकारच्या माहितीचा खजिनाच त्याच्या हाती लागतो. याचा वापर माकेर्टिंग तसंच विक्रीसाठी करण्यात वॉलमार्टसारख्या कंपन्यांचा हातखंडाच आहे. (अर्थात त्यामुळे पुण्यातले दुकानदार दुपारी दुकानं उघडी ठेवायला लागतील असा गोड गैरसमज करून घ्यायची गरज नाहीये!)
१९४०च्या दशकाच्या शेवटी बर्नार्ड सिल्व्हर आणि नॉर्मन वूडलॅंड यांनी बार कोडच्या तंत्रज्ञानाची मुळं रोवली. त्यानंतर बऱ्याच उलथापालथी होऊन २६ जून १९७४ रोजी 'मार्श सुपरमाकेर्ट' या ट्रायमधल्या दुकानात च्युइंगगम बार कोडचा वापर करून विकली जाणारी पहिली वस्तू ठरली.
बार कोडच्या तंत्रज्ञानात प्रत्येक वस्तूवर काढलेल्या कमी जास्त जाडीच्या काळ्या आणि पांंढऱ्या रेघांचा वापर केलेला असतो. आपण जेव्हा एखाद्या दुकानात कुठलीही वस्तू खरेदी करतो तेव्हा तिच्या वेष्टनाचं निरीक्षण करा. त्यावर कुठेतरी आपल्याला उभ्या काळ्या रेघा आणि काही आकडे दिसतील. त्यातल्या काही रेघा अगदी बारीक तर काही जाडजूड दिसतील. हाच तो बार कोड! यातले आकडे हा आपण वाचू शकणारा बार कोड असतो. तर काळ्या-पांढऱ्या रेघांत तोच बार कोड कॅशियरकडच्या स्कॅनरला समजेल अशा भाषत्ेा लिहिलेला असतो. जेव्हा काऊंटरवरचा माणूस आपली वस्तू त्याच्याकडच्या यंत्राजवळ नेतो तेव्हा हा बार कोड (खरं म्हणजे चक्क काही उभ्या रेघांचा संच) वाचून त्या वस्तूबद््दलची माहिती आपोआप त्या कॅशियरच्या कम्प्युटरकडे येते. आता हे होतं कसं?
यासाठी प्रत्येक वस्तूसाठी एक बार कोड ठरलेला असतो. या बार कोडचे डावा आणि उजवा असे दोन भाग असतात. यातल्या दोन्ही भागांमध्ये प्रत्येकी सहा आकडी कोड असे एकूण बारा आकडे अमेरिकन बार कोड मध्ये असतात. यूरोपमध्ये मात १३ आकडी बार कोड असतात. डावी आणि उजवी बाजू मिळून एखाद्या वस्तूचा बारा आकडी बार कोड ७८०७५१- ३०२१५८ असा असेल तर त्याचा अर्थ कसा लावायचा? आपल्या उदाहरणातला पहिला आकडा (७) त्या वस्तूचा प्रकार (उदाहरणार्थ घरगुती वापरासाठीची वस्तू ) ठरवतो. यानंतरचे पाच आकडे (८०७५१) त्या वस्तूच्या निर्मात्याला (उदाहरणार्थ हिंंदुस्थान लिव्हर) दिलेला कोड नम्बर असतो. त्यानंतरचे पाच आकडे (३०२१५) ती वस्तू (उदाहरणार्थ लक्स साबण) अचूकपणे ओळखण्यासाठी वापरलेला कोड नम्बर असतो. शेवटचा म्हणजे बारावा आकडा (८) काही चूक झालेली असेल तर ती सुधारण्यासाठी वापरतात. अर्थात प्रत्यक्षात बार कोडचे अनेक स्टॅंंडर्स असतात, त्यातल्या एकाबद्दल आपण बोलतोय.
या स्टॅडंर्डमध्ये हे बार कोड ज्या कागदाच्या भागावर छापलेलं असतं, त्या भागाचे ११३ निमुळते लांब चौकोनाकृती पोटविभाग पाडलेले असतात. यातल्या प्रत्येक चौकोनात उभी काळी किंवा पांढरी रेघ असते. मग यातल्या पांंढऱ्या रेघेला आपण ० आणि काळ्याला १ अशी कोडभाषा ठरवू शकतो. थोडक्यात या बार कोडमध्ये ११३ काळ्या रेषांपैकी, प्रत्येकी पहिल्या आणि शेवटच्या १२ रेषांना 'क्वाएट झोन' असं म्हणतात. त्यांचा वापर स्कॅनरला 'बार कोड आता सुरू होत आहे' आणि 'बार कोड आता संपलं' अशा सूचना ते वाचताना देण्यासाठी होतो. तसंच बरोबर मधल्या ५ रेषा गार्ड बॅडज म्हणून वापरल्या जातात. यामुळे प्रत्यक्ष बार कोडसाठी ११३-(१२+ १२+ ५)=८४ रेषा वापरल्या जातात. यातल्या गार्ड बॅडजच्या डावीकडल्या ४२ रेषा या प्रत्येक आकड्यासाठी ७ या दरानं बार कोडमधल्या पहिल्या ६ चन्हांसाठी/आकड्यांसाठी वापरतात. तर गार्ड बॅडज्च्या पलिकडल्या ४२ रेषा या पुन: प्रत्येक आकड्यासाठी ७ या दरानं बार कोडमधल्या शेवटच्या ६ चिन्हांसाठी/आकड्यांसाठी वापरल्या जातात.
हे आता प्रत्येक अक्षर आणि आकडा याच्यासाठी ७ रेषांचं (बिटसचं) कोड ठरलेलं असतं. आकृतीत 'ए' आणि '७' यांची कोडस् दाखवली आहेत. आता या कोड भाषेप्रमाणे ते बार कोड त्या पदार्थावरच्या कागदावर चिकटवतात.
जेव्हा बार कोडचे काळे-पांढरे चौकोन कॅशियर स्कॅनरसमोर धरतो तेव्हा स्कॅनरमधून आलेला प्रकाश काळ्या रेघा शोषून घेतात. तर पांंढऱ्या रेघा तो परावतीर्त करतात. प्रत्येक पांढऱ्या रेघेला ० आणि काळ्या रेघेला १ असं बिट समजून स्कॅनर आपल्या चौकोनांचं रूपांतर बिटस्मध्ये करतो. त्यातली 'क्वाएट झोन' आणि 'गार्ड बॅडस्'वाली बिटस् वगळून उरलेल्या ८४ बिटस्चा १२ आकडी बार कोड स्कॅनर त्याला जोडलेल्या कम्प्युटरकडे पाठवतो. प्रत्येक बार कोडवरून त्या वस्तूची किंमत किती हे कम्प्युटरमध्ये आधी साठवलेले असल्यानं लगेच किंमतीचा आकडाही आपल्याला पडद्यावर दिसतो.
वेगवेगळ्या वस्तूंसाठी वेगवेगळ्या संस्था, बार कोडस् कसे असावेत हे ठरवतात. उदाहरणार्थ 'इंटरनॅशनल स्टँडर्ड बुक नम्बर एजन्सी (आयएसबीएनए)' ही संस्था पुस्तकासाठीचा 'आयएसबीएन' हा दहा आकडी बार कोड ठरवते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा