आरएफआयडी तंत्रज्ञानाचा वापर सुरुवातीला बार कोड तंत्रज्ञानासाठीचा पर्याय म्हणून झाला. अनेक देशांनी आता पासपोर्टमध्ये आरएफआयडी टॅग बसवायला सुरूवात केली आहे. एका दशकापूर्वी मलेशिया हा असे पासपोर्ट देणारा पहिला देश ठरला. २००६ साली अमेरिकेनंही असे पासपोर्ट आपल्या नागरिकांना द्यायला सुरूवात केली.
वस्तूवर चिकटवलेला 'बार कोड' स्कॅनरपाशी नेऊन स्कॅन केल्यावरच त्या वस्तूविषयी माहिती मिळते. त्याऐवजी दुरूनच त्या वस्तूनं स्वत:विषयी माहिती पुरवली तर काय होईल? ते 'रेडिओ फ्रिक्वन्सी आयडेंटिफिकेशन (आरएफआयडी)'मुळे साधलं जातं. उदाहरणार्थ समजा, सुपरमाकेर्टमध्ये ट्रॉलीत बऱ्याच वस्तू आहेत, आणि ती ट्रॉली आपण काऊंटरवरून नेतोय. अशावेळी कुठलीही वस्तू न उचलताही त्या काऊंटरवरच्या रीडरला त्या ट्रॉलीत, कुठल्या आणि किती वस्तू आहेत हे कळलं, आणि तो त्याचं बिल लगेच बनवू शकला तर किती मजा येईल? हे आरएफआयडीमुळेच शक्य होतं. यामुळे मोठ्या दुकानात कुठली वस्तू कुठे आहे? किती शिल्लक आहे? संपत आली असेल तर पुन्हा त्याची ऑर्डर द्यायची का? किंवा कोणाची एक्स्पायरी डेट संपली आहे? वगैरे सगळं आपल्याला बसल्या जागी कळू शकतं. याच धतीर्वर दुकानांमधून वस्तू चोरणाऱ्या मंडळींचा छडा पण आरएफआयडी तंत्रज्ञान लावू शकतं. ते कसं?
यासाठी बार कोडच्याच धतीर्वर आरएफआयडीमध्ये सुध्दा एक 'टॅग' असतो. हा टॅग वस्तूंना चिकटवला तरी जातो. किंवा कधी कधी तो वस्तूंच्या आतही असू शकतो. हा टॅग त्या वस्तूंचं कोड, त्यांचं उत्पादन, कोणी कधी केलंय वगैरे गोष्टींविषयीची माहिती साठवतो. आरएफआयडीचा टॅग तीन गोष्टींंचा मिळून बनतो. एक म्हणजे अॅंंटेना, दुसरी म्हणजे चिप, आणि तिसरा म्हणजे ट्रान्सीव्हर.(ट्रान्समिट-रिसीव्हर). यापैकी अॅंटेना हा रेडिओ किंवा मोबाइल फोनमध्ये असतो तसा आपल्या डोळ्यांना दिसणार नाही अशा आकाराचा असतो. तसंच चिपमध्ये, कम्प्युटरमध्ये असतो तसा सीपीयू आणि मेमरी या गोष्टी असतात. तर अॅंटेना ट्रान्सीव्हरच्या मदतीनं टॅगमधून बिनतारी संदेश पाठवतात किंवा मिळवतात. असे अनेक आरएफआयडी टॅग्ज एका आरएफआयडी रीडर नावाच्या यंत्राबरोबर संभाषण करू शकतात. जवळजवळ २० फूट अंतरापर्यंत टॅग आणि रीडर यांच्यातलं संभाषण अगदी सहजपणे होऊ शकतं.
हा आरएफआयडी रीडर बार कोडमध्ये स्कॅनर जे काम करतो ते इथे करतो. तो आरएफआयडी टॅग्जनी पाठवलेली माहिती वाचून तिचा अर्थ लावू शकतो. अर्थातच टॅग्ज आणि रीडर यांचं संभाषण अदृश्य अशा बिनतारी संदेशांच्या माध्यमातून होतं. बिनतारी संदेशांना फार पूवीर्पासून 'रेडिओ सिग्नल्स' असं म्हटलं जातं. तेच नाव आरएफआयडी तंत्रज्ञानालाही चिकटलं आहे. आरएफआयडी रीडर एका संगणकीय जाळ्याला जोडलेला असतो. टॅग्जकडून मिळालेली माहिती तो या जाळ्यातल्या मुख्य कम्प्युटरकडे पाठवून देतो. हा कम्प्युटर मग रीडरकडून आलेल्या माहितीला योग्य प्रकारे साठवतो.
जेव्हा एखादा चोर एखादी वस्तू खिशात घालून त्याचे पैसे न भरता जात असेल, तर काऊंटरवाल्या रीडरला ते बरोबर समजतं, आणि त्यानं बिल भरलेलं नाहीये हे कम्प्युटरला कळल्यावर मग आपण तिथे एक भोंगा वाजवण्याची व्यवस्था करू शकतो.
आरएफआयडी टॅग्ज हे तीन प्रकारचे असतात. अॅक्टिव्ह, सेमी पॅसिव्ह, आणि पॅसिव्ह! यातल्या अॅक्टिव्ह टॅग्जचं काम चालण्यासाठी टॅग्जच्याच आत एक छोटीशी बॅटरी असते. याउलट पॅसिव्ह टॅग्जना लागणारी ऊर्जा ही रीडरकडूनच येत असते. सेेमी पॅसिव्ह टॅग्जमध्ये या दोन पैकी एक पध्दत असू शकते. साहजिकच अॅक्टिव्ह टॅग्ज्चा आकार, त्याच्या मेेमरीची क्षमता आणि संभाषणाची रंेंज सगळ्यात जास्त असते. काही आरएफआयडी रीडर्स हातात घेऊन फिरता येतात तर काही एका ठिकाणी बसवलेले असतात.
आरएफआयडी तंत्रज्ञानाचा वापर सुरुवातीला बार कोड तंत्रज्ञानासाठीचा पर्याय म्हणून झाला. अनेक देशांनी आता पासपोर्टमध्ये आरएफआयडी टॅग बसवायला सुरूवात केली आहे. एका दशकापूवीर् मलेशिया हा असे पासपोर्ट देणारा पहिला देश ठरला. २००६ साली अमेरिकेनंही असे पासपोर्ट आपल्या नागरिकांना द्यायला सुरूवात केली. त्यातला एक घोळ असा की, इमिग्रेशनची मंडळीच फक्त या पासपोर्टमधल्या टॅगची माहिती वाचू शकतील. आणि पासपोर्टमधली माहिती गोपनीय राहील या दृष्टीनं या टॅग्जची रेंज फक्त १० सेंमी असेल, असं सरकारनं जाहीर केलं. पण प्रत्यक्षात १० मीटर्स अंतरावरून साध्या रीडर्सचा वापर करूनही या टॅग्जमधली माहिती अनेकजण वाचू शकत होते. त्यामुळे मग टॅग्जच्या निमिर्तीतील बदल, चार आकडी पिनचा वापर असे अनेक उपाय योजले गेले.
याखेरीज वाहनांचा पथकर आपोआप भरण्यासाठीही आरएफआयडीचा वापर होतो. म्हणजे वाहनांनी थांबून पैसे देऊन पावती किंवा टोकन घेण्याची गरजच नाही. प्रत्येक वाहनधारकानं त्या कर गोळा करणाऱ्या कंपनीकडे एक अकाऊंट ठेवायचं. एखादं वाहन पथकर नाक्याला ओलांडून जाताना वाहनात बसवलेला टॅग मग त्यामध्ये आधी भरलेल्या पैशांच्या बॅलन्समधून तेवढे पैसे वजा करतं, आणि सांकेतिक भाषांच्या संदेशांमधून पथकर गोळा करणाऱ्या कंपनीच्या खात्यात ते पैसे जमा हेातात. आता तर आरएफआयडी टॅग्ज हे दुमिर्ळ प्राण्यांना चिकटवले जातात. त्यावरून त्यांचा माग काढणं, त्यांचं संरंक्षण करणं शक्य होतं. यापुढे जाऊन आता चक्क माणसाच्या शरीरावर आरएफआयडी टॅग्ज लावायची टूम निघाली आहे. १९९८ साली 'केव्हिन वॉविर्क' नावाच्या ब्रिटिश संशोधकानं यावर प्रथम काम केलं. आता युरोपात अनेक नाइटक्लब्ज 'व्हीआयपी ग्राहकां'ना ओळखण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करतात. आपली मुलं कुठे खेळताहेत किंवा आपला तरुण मुलगा अभ्यासाच्या नावाखाली कुठल्या मैत्रिणीबरोबर वेळ दवडतोय हेही आईवडिलांना कळू शकेल. आता तर विशिष्ट प्रकारची सुई वापरून असे टॅग्ज प्राणी किंवा माणूस यांच्या शरीरात घुसवणंही शक्य झालंय! अशा टॅग्जचा आकार तांदळाच्या दाण्याइतका असतो व त्यांचा वापर करून माणसाच्या शरीरातले बदल, आजार, रोग यांच्यावर नियंत्रण मिळवणं काही वर्षांनी शक्य होईल असं काहींचं मत आहे!
१९४०-१९५० च्या दशकात रडारचा शोध लागला, आणि १९४८ साली हॅरी स्टॉकमननं आरएफआयडीविषयी एक प्रबंध लिहिला. पण १९८० च्या दशकात प्रथमच आरएफआयडीचं तंत्रज्ञान सर्वसामान्य दृृष्टीनं वापरात आलं. १९८७ साली नॉवेर्त पथकर गोळा करण्यासाठी त्याचा वापर झाला. उद्याच्या जगात आरएफआयडी बराच धुमाकूळ घालणार आहे यात काही शंकाच नाही !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा